पाचवडकरांचे यात्रेदिवशीही श्रमदान!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

कलेढोण - ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. शासनाला प्रस्ताव देऊन महिने लोटले. मात्र, गावात टॅंकर फिरकलाच नाही. मग पाण्यासाठीच दिवस-रात्र लढणाऱ्या गावकऱ्यांनी गावाजवळील पाटलीनताई नावाचा शिवार खोरे-टिकाव घेऊन पिंजून काढले. ‘आधी लगीन जलसंधारणाचं, मग देवाचं’ अशी स्थिती पाचवडमध्ये निर्माण झाली आहे.

पाचवडकरांनी यावर्षी दुष्काळाशी दोन हात करण्याचे ठरवले आहे. पाटलीनताई नावाच्या शिवारातील तलावात पाणी साठून राहते. तलावात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्यास गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत नाही. त्यासाठी गावकऱ्यांनी हा तलाव परिसराचे रुंदीकरण, खोलीकरण करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी गावकरी श्रमदान करीत आहेत. मायणी, कलेढोण, विखळे, मुळीकवाडी आदी गावांतील व्यक्ती, संघटना, संस्था सहभागी होत आहेत. 

जलसंधारणाच्या कामांसाठी सुमारे तीन लाखांचा निधी जमा झाला आहे. सुमारे ४५ दिवस चालणारे हे काम पुढील वर्षीही चालू ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार आहे. गावातील ग्रामदैवत जोतिबा देवाची रथयात्रा नुकतीच झाली. गावात चाकरमानेही दाखल झाले होते. यात्रेदिवशीही ग्रामस्थांनी जलसंधारणाच्या कामाला सुट्टी घेतली नाही.

‘पाटलीनताई’ हटवणार दुष्काळ? 
गावच्या ईशान्य-पूर्वेस पाटलीनताई नावाचे शिवार असून डोंगररांगावरून येणारे पाणी पाटलीनताई तलावात साठून राहते. त्यामुळे गावच्या विहिरी, बोअरवेलला चांगला पाणीपुरवठा होऊन पिण्याची पाणीटंचाई दूर होते. त्यामुळे गावातल्या ‘पाटलीनताई’ (तलाव) दुष्काळ हटवणार? अशी आशा गावकरी करून आहेत.

Web Title: Labor donations by pachwad people