कऱ्हाड : कामगाराचा मशीनमध्ये अडकून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

कऱ्हाड : येथील कचरा डोपोवर कचरा वर्गीकरणाचे काम सुरू असताना सक्रीनींग मशीनमध्ये अडकून कामागाराचा मृत्यू झाला. अतुल रमेश कावडे (वय 27, रा. चांदोरे, ता. तिरोडा जि. गोदींया) असे संबंधित कामागाराचे नाव आहे. येथील बारा डबरी परिसरातील कचरा डेपोवर सायंकाळी पाचच्या सुमारास प्रत्यक्ष काम सुरू अशताना दुर्घटना घडली. कचरा वर्गीकरणाचे ठेका घेणाऱ्या पुण्याच्या कोथरूड येथील सेव्ह एनव्हारयमेंट मॅनेजमेंट अॅण्ड इंजिनिअरिंग कंपीनीत अतुल रोजंदारीवर मशीनच्या ऑपरेटरचा मदतनीस म्हणून काम करत होता. 

कऱ्हाड : येथील कचरा डोपोवर कचरा वर्गीकरणाचे काम सुरू असताना सक्रीनींग मशीनमध्ये अडकून कामागाराचा मृत्यू झाला. अतुल रमेश कावडे (वय 27, रा. चांदोरे, ता. तिरोडा जि. गोदींया) असे संबंधित कामागाराचे नाव आहे. येथील बारा डबरी परिसरातील कचरा डेपोवर सायंकाळी पाचच्या सुमारास प्रत्यक्ष काम सुरू अशताना दुर्घटना घडली. कचरा वर्गीकरणाचे ठेका घेणाऱ्या पुण्याच्या कोथरूड येथील सेव्ह एनव्हारयमेंट मॅनेजमेंट अॅण्ड इंजिनिअरिंग कंपीनीत अतुल रोजंदारीवर मशीनच्या ऑपरेटरचा मदतनीस म्हणून काम करत होता. 

पोलिस व घटनास्थळावरील माहिती अशी, पालिकेने येथील कचऱ्याचे विघटन करण्यासाठी मोठी सक्रीनींग मशीन भाडेतत्वावर येथे आणली आहे. कचऱ्याचे वर्गीकरण व विघटन करण्याचा ठेका पुण्याच्या कोथरूड येथील सेव्ह एनव्हारयमेंट मॅनेजमेंट अॅण्ड इंजिनिअरिंग खासगी कंपनीकडे दिला आहे.स जुलैपासून येथे कचर्याचे विघटन सुरू आहे. त्यासाठी मोठी सक्रीनींग मशीनही संबधित कंपनीने भाडे तत्वावर आणली आहे. त्याव्दारे येथील बारा डबरी परिसरात साचून राहिलेला व रोजच्या येणाऱ्या किमान तेरा टन कचऱ्याचे वर्गीकरण केले जाते. त्यासाठी त्या वर्गीकरणाच्या मशीनवर त्याच कंपनीने सहा कर्मचारी आहेत. नेहमीप्रणाणे वर्गीकरणाचे काम सुरू असताना सायंकाळी चारनंतर दुर्घटना घडली. स्क्रीनींग मशीन चालू होती. त्यावेळी त्यात अडकलेला कचरा काढण्यासाठी अतुल कावडे यांनी वाकून हात मशीनमध्ये घातला. मात्र दुर्देवाने त्या पट्ट्यात त्यांचा हात अडकला. त्याचवेळी वेगाने ते आत ओढले गेले. त्यावेळी त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागला. त्याचवेळी त्यांचा हातही शरीरापासून वेगळा झाला. ती गोष्ट लक्षात येताच नशीनच्या ऑपरेटरने ती मनसीन त्वरीत बंद केली. तोपर्यंत मशीनमध्ये अडकलेल्या अतुल कावडे यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्याबाबतची माहिती पालिकेचे कर्माचारी किरण कांबळे यांनी त्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचवेळी त्यांनी ती माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनाही दिली. मुख्याधिकारी डांगे यांनी त्वरीत घटनास्थळी आले. त्यांनी तेथील स्थिती पाहून त्यांनीही पोलिसांना माहिती दिली.

हवालदार चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देवून पंचानामा केला. सायंकाळी उशिरापर्यंत घटनेची नोंद पोलिसात नोंदविण्याचे काम सुरू होते. कावडे यांच्या बाबत घडलेल्या दुर्घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे. त्यांचे नावतेवाईक आज सायंकाळी गोंदीयाहून यायला निघाले आहेत. तोपर्यंत त्यांचा मृतदेह येथील शवागृहात ठेवण्यात येणार आहे. उद्या सकाळी नातेवाईक आल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. कचऱ्याचे वर्गीकरणाचे काम दोन दिवासात संपणार होते. भाडे तत्तवार आणलेली स्क्रीनींग मंशीनचेही दोन दिवासात साधरणपणे 15 डिसेंबरला काम संपणार होते. त्यामुळे मशीन व त्यावरील कामगारही जाणार होता. मात्र त्यापूर्वीच घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत होती. 

पालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग घेताल आहे. त्याची कामेही सुरू आङेत. मात्र लोकांचे जीव जाईपर्यंत काम होणे अपेक्षीत नाही. स्क्रीनींग मशीनमध्ये अडकून गोंदीयाच्या कामागाराच मृत्यू झाला. त्याला जबाबदार कोण प्रश्न आहे. पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कळस आहे. पालिकेने स्वच्छतेसाठी काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षीततेचा काहीच विचार केला नाही. हेही गंभीर आहे. 
- सौरभ पाटील, विरोधी पक्ष नेते, कऱ्हाड पालिका 

Web Title: labor s death because of stucking in machine at karhad