मजूर महिला पाय घसरुन पडली विहिरीत; तरुणांच्या मदतीनंतर वाचला जीव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

laboring woman slipped fell into wel
मजूर महिला पाय घसरुन पडली विहिरीत; तरुणांच्या मदतीनंतर वाचला जीव

मजूर महिला पाय घसरुन पडली विहिरीत; तरुणांच्या मदतीनंतर वाचला जीव

नेर्ले - वाटेगाव (ता. वाळवा) - येथे पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर विहिरीत पाय घसरुन पडलेल्या ऊस तोड मजूर महिलेला (Labour Women) दोरखंडाच्या साहाय्याने गावातील तरुणांनी (Youth) बाहेर काढून तिला जीवदान (Life Saving) दिले. अर्ध्या तासाहून अधिक काळ मृत्यूशी संघर्ष करणाऱ्या बीड तालुक्यातील राखी अशोक रोकडे (Rakhi Rokade) यांचा वाटेगावच्या युवकांनी जीव वाचवला. रविवारी दुपारी ही घटना घडली. सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील, शीतलकुमार शेटे, संतोष शिंदे, रमेश साळुंखे, सुशांत माने, प्रणव जाधव, दयानंद साळुंखे अशी या धाडशी युवकांची नावे आहेत.

कारखान्याचे धुराडे पेटून अनेक दिवस उलटले आहेत. परिसरामध्ये ऊसतोड मजूर दाखल झाले आहेत.वाळवा तालुक्यातील वाटेगावात बीड येथील ऊसतोड मजूरांच्या झोपड्या आहेत. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या वाटेगाव युनिट नंबर २ नजिक ऊस तोडणी मजुरांच्या झोपड्यात राखी रोकडे या कुटुंबासह राहतात. येथील माऊली देवस्थान नजीक असणाऱ्या विहिरीत त्या पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांचा पाय घसरुन त्या विहिरीत पडल्या. विहिरीला पायऱ्या नसल्याने कसाबसा जीव वाचवत त्या विहिरीच्या कडेला असणाऱ्या दगडांचा आधाराने वर येण्याचा प्रयत्न करत होत्या.

हेही वाचा: अनैतिक संबंध नसतानाही झाली मारहाण; मग त्याने कवटाळले मृत्यूला

तब्बल अर्धा तासाच्या मृत्यूशी त्यांची झुंज सुरू होती. राखी यांना परत येण्यास उशीर झाल्याने अन्य ऊस तोड महिलांनी विहिरी नजीक जाऊन पाहिले असता राखी या विहिरीत पडल्याचे दिसले. राखी यांनी कसाबसा मोटरला बांधलेल्या दोरीचा व दगडाचा आधार घेतला होता. उसतोड महिलांनी शेजारील क्रीडांगणावर खेळणाऱ्या मुलांना बोलावले. यावेळी युवकांनी घटनास्थळी धाव घेत राखी रोकडे यांना पाण्याबाहेर काढले. यावेळी राखी रोकडे यांचा जीव कासावीस झाला होता.जीवनदान दिलेल्या युवकांचे राखी यांनी आभार मानले.

लहान मुली पण उतरतात विहिरीत..

ऊसतोड मजुरांच्या मालकांनी पिण्याच्या पाण्याची सोय करणे आवश्यक आहे. कारण पिण्याचे पाणी नसेल तर उघड्या असणाऱ्या विहिरीमध्ये ऊसतोड मजुरांच्या लहान मुली पाण्यासाठी विहिरीत उतरतात. त्यामुळे मुलींच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :YouthwomenLife
loading image
go to top