मजूर कामावर नसतानाही बिले काढली

नागेश गायकवाड
सोमवार, 9 जुलै 2018

आटपाडी : येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून सोलापूर जिल्हा हद्दीतील वृक्षलागवड आणि संगोपनाची गेली दीड वर्षे बिले काढण्याचा प्रताप उजेडात आला आहे. याशिवाय जिल्ह्यात मजूर नसतानाही बिले काढल्याची तहसीलकडे शेटफळे ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत. या वादग्रस्त कामाचे मस्टर तातडीने बंद करण्याचे आदेश दिलेत.    

तालुक्यात रोजगार हमी योजनेतून वृक्ष लागवड कामात गैरव्यवहार सुरू आहे. सदरची वृक्षलागवड वनीकरण विभागाने रोजगार हमी योजनेतून गावोगावच्या पुढारी ठेकेदारांच्या माध्यमातून केली आहे. संगोपन आणि पाणी घालण्यासाठी मजुरी काढली जाते. तसेच झाडे संभाळण्यासाठी शेण आणि वरखते आदी साठीही खर्च दाखवला जातो. प्रत्यक्षात स्थिती वेगळी आहे. एवढेच नाही तर शेटफळे ग्रामपंचायतीमार्फत लागवड केलेली शेटफळे-बनगरवाडी, शेटफळे-लेंगरेवाडी,शेटफळे- चिंध्यापीर या रस्त्यावरील सोलापूर जिल्हा हद्दीतील वृक्ष दाखवून दीड वर्षे मजूरी काढण्याचा प्रताप केल्याचे उजेडात आले आहे.सोल्हापूर जिल्हयातील वृक्षाची सांगलीतील अधिकारयांचा संबंध नसताना मजूरी काढली जात असल्याची शेटफळे ग्रामस्थांनी  महसुलकडे तक्रार केली आहे.यासाठी वनमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्याची भेटही घेणार आहेत.                   

वनीकरण अधिकाऱ्यांनी सोल्हापूर जिल्हा हद्दीतील झाडे दाखवून दिड वषेॅ मजूरी कढली आहे. चौकशी करून संबंधिताकडू वसुली करावी.
- प्रकाश गायकवाड (ग्रामपंचायत सदस्य)                                 

शेटफळेत वृक्षलागवडीची बोगस कामे असून कामावर मजूर नाहीत. अधिकारयांनी कामाचे मास्टर बंद ठेवावे.
- ब्रह्मदेव पडळकर (समाजकल्याण सभापती)

Web Title: labors are not on work still bills are received