पैसे असूनही आमची माणसं मात्र दगावत आहेत ; कोणती आहे घटना

शामराव गावडे
Sunday, 6 September 2020

कोरोनाच्या संशयामुळे नॉन कोविड रुग्णाची फरफट सुरू आहे. उपचारविना त्यांचे हाल होत आहेत.

नवेखेड : कोरोनाच्या संशयामुळे नॉन कोविड रुग्णाची फरफट सुरू आहे. उपचारविना त्यांचे हाल होत आहेत.  त्यासाठी तातडीने उपचार होणे गरजेचे आहे. संपूर्ण जिल्हा कोरोनाग्रस्त आहे. रोज वेगवेगळ्या गावात कोरोनाचे रूग्ण सापडल्याची माहिती मिळते. अनेकजनांचा मृत्यू झाला आहे. या सगळयाचा  नॉन कोविड रुग्णांच्या उपचारावर परिणाम झाला आहे.  या रुग्णांच्या उरचारासाठी रुग्णालयाने आपले दरवाजे बंद केले आहेत.

हेही वाचा -  रूग्णाचा मृत्यू, नातेवाईकांचा गोंधळ; कोविड सेंटरमध्ये तोडफोड... वाचा कुठे घडली घटना 

कोविडची टेस्ट करून या मग उपचार करू असा सूर डॉक्टर देत आहेत. कोविड टेस्ट करायला रुग्णांना किंवा नातेवाईकांना अडचन नाही, परंतु त्यासाठी दोन ते चार दिवसांचा कालावधी लागत असल्याने मूळ आजार बळावत आहे.  वेळीवर उपचार न झाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अगदी किरकोळ आजारी असलेल्या रुग्णांनाही याचा फटका बसला आहे. 

आजारी रुग्णांची कोविड टेस्ट केली आणि त्यातील एखादी टेस्ट पोझिटीव्ह आली तर कोविडच्या उपचारांना सुरवात केली जाते. परिणामी मूळ दुखण्याकडे दुर्लक्ष होते आणि रुग्णाला जीवाला मुकावे लागते. नवेखेड, बोरगाव परिसरात अशा घटना घडत आहेत. कोविड महामारीच्या विरोधात प्रशासन, डॉक्टर, इतर सेवक झटत असले तरीही नॉन कोविडची तपासणी करणे ही त्यांची जबाबदारी आहे. 

हेही वाचा - सासूला वार वर्मी बसला, पळून जाताना जावयाचाही अंत झाला... काय झाले वाचा?

कोविड रुग्ण हाताळताना जी खबरदारी घेतली जाते. तीच खबरदारी रेग्युलरचे रुग्ण हाताळताना घ्या, त्यांच्यावरील उपचार बंद करू नका अशी मागणी लोकांमधून होत आहे. यामुळे काही डॉक्टरांच्या चुकीच्या भूमिकेमुळे उपचारासाठी पैसे असूनही उपचाराअभावी रुग्ण दगावत आहेत.
 जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य विभागामार्फत प्रत्येक गावात नॉन कोविडच्या तपाणीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

"गावोगावी नॉन कोविड रुग्णाची तपासणी अत्यावश्यक बनत चालली आहे. त्यांच्यावरील उपचार वेळेत व्हावेत."
 

- कार्तिक पाटील, संचालक राजारामबापू साखर कारखाना

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lack of treatment for non covid patients are dead in sangli area people demand on doctors for non covid patients