सोलापूर शहराला पुन्हा पाणीटंचाई जाणवणार

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

सोलापूर ः धूळखेड आणि संख (जि. विजयपूर, कर्नाटक) हद्दीत शेतीपंपातून 24 तास सुरू असलेल्या पाणी उपशामुळे औज आणि चिंचपूर बंधाऱ्यांतील पाणी डिसेंबरच्या पंधरवड्यातच संपण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा नियंत्रित करावा, असे पत्र महापालिकेचे आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी विजयपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना  पाठवले. नियोजनानुसार हे पाणी 5 जानेवारी 2019पर्यंत पुरवठा होणे अपेक्षित आहे. 

उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर सोलापूर शहराचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. 29 ऑक्‍टोबर ते 6 नोव्हेंबर 2018 या कालावधीत औज आणि चिंचपूर बंधारे प्रत्येकी साडेचार मीटरपर्यंत भरून घेण्यात आले. मात्र कर्नाटक हद्दीतील शेतकऱ्यांकडून या दोन्ही बंधाऱ्यांतून 24 तास पाणी उपसा केला जात आहे. त्यामुळे औज, चिंचपूर बंधारा आणि टाकळी इंटकवेल येथील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. 

औज व चिंचपूर या दोन्ही बंधाऱ्यांतील आजच्या घडीची पाण्याची पातळी अनुक्रमे साडेतीन आणि तीन मीटरपर्यंत आली आहे. शेतकऱ्यांकडून सातत्याने होणारा उपसा नियंत्रित केला नाही, तर या दोन्ही बंधाऱ्यांतील पाणी डिसेंबरमध्येच संपणार असून, त्यामुळे सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सिंदखेड आणि संख येथील शेतीचा वीजपुरवठा नियंत्रित करण्यासाठी आदेश करावेत, जेणेकरून सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार नाही, असे आयुक्तांनी पत्रात म्हटले आहे. 

"शासनस्तरावर व्हावेत प्रयत्न' 
औज आणि चिंचपूर बंधारे भरले की दरवेळी कर्नाटक हद्दीतील पाणी उपशाची समस्या निर्माण होते. त्यानंतर महापालिका आयुक्त आणि विजयपूरचे जिल्हाधिकारी यांच्यात पत्रव्यवहार सुरू होतो, अंत्यत गंभीर स्थिती असेल तर विजयपूर प्रशासनाकडून प्रतिसाद मिळतो, अन्यथा काहीच होत नाही. त्यामुळे हा प्रश्‍न कायम स्वरूपी सुटण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक शासनाकडून कायमस्वरूपी तोडगा काढावा, असे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

Web Title: lack of water will be in solapur