दप्तराचे ओझे कमी करण्याचा ‘लाहोटी पॅटर्न’

सचिन देशमुख
शनिवार, 1 डिसेंबर 2018

कऱ्हाड - केंद्र शासनाने दप्तराचे ओझे कमी करण्याचे निर्देश दिल्याने शाळकरी मुलांच्या चेहऱ्यावर हस्य फुलले आहे. शाळांपुढे दप्तराचे ओझे कमी करण्याचे आव्हान असले तरी येथील शिक्षण मंडळाच्या (कै.) रामविलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालेने विद्यार्थिनींच्या दप्तरांमधील पुस्तकांचे ओझे कमी करण्यासाठी राबवलेला ‘लाहोटी शाळा पॅटर्न’ अन्य शाळांना अनुकरणीय ठरणार आहे. 

कऱ्हाड - केंद्र शासनाने दप्तराचे ओझे कमी करण्याचे निर्देश दिल्याने शाळकरी मुलांच्या चेहऱ्यावर हस्य फुलले आहे. शाळांपुढे दप्तराचे ओझे कमी करण्याचे आव्हान असले तरी येथील शिक्षण मंडळाच्या (कै.) रामविलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशालेने विद्यार्थिनींच्या दप्तरांमधील पुस्तकांचे ओझे कमी करण्यासाठी राबवलेला ‘लाहोटी शाळा पॅटर्न’ अन्य शाळांना अनुकरणीय ठरणार आहे. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

दप्तरतील भार हलका करण्यासाठी शाळेने पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींना पुस्तकांचे दोन संच उपलब्ध करून दिले आहेत. त्याचे नियोजन शाळेने केले आहे. यंदा सहावीमध्ये गेलेल्या विद्यार्थिनींना शाळेने सर्व शिक्षा अभियानातून दिलेली पाचवीची मोफत पाठ्यपुस्तके ही निकालावेळी परत घेतली जातात. तसेच नवीन शैक्षणिक वर्षामध्ये पाचवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींना सर्व शिक्षा अभियानाची नवीन पुस्तके देवून त्याचा उपयोग विद्यार्थिनींना घरातील अभ्यासासाठी करण्याच्या सूचना दिल्या जातात. शाळेमध्ये येताना दप्तरातून पाठ्यपुस्तके न आणता गेल्या वर्षीच्या विद्यार्थिनींकडून जमा झालेली पुस्तके शाळेत अभ्यासासाठी उपलब्ध करून दिली आहेत. प्रत्येक बॅचेसमध्ये विद्यार्थिनींच्या शाळेतील अभ्यासासाठीचा पुस्तक संच असल्याने विद्यार्थिनींना तो हताळणे सहज शक्‍य होते. पुस्तके कमी असल्यास एका बॅचवर दोन विद्यार्थिनींमध्ये एक पुस्तक संच अभ्यासासाठी वापरला जातो. सहाजिकच दप्तरात घरातून शाळेत आणावी लागणारी भाषेसह अन्य पुस्तकांचा भार हा कमी होतो. त्यामुळे दप्तरात केवळ वह्याच आणाव्या लागत आहेत. अन्य शाळांनी लाहोटी कन्या प्रशालेच्या पॅटर्नचे अनुकरण केल्यास विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी होण्यासाठी निश्‍चितपणे मदत होईल. त्याशिवाय २०० पानी वह्या न वापरता शंभर पानी वह्या किंवा २०० पानी वह्यात दोन विषय यानुसार त्याचे नियोजन केले जाते. आठवड्यातून एक वेळ शिक्षकांकडून विद्यार्थिनींच्या दप्तराची तपासणी होऊन अनावश्‍यक आणले आहे का, हेही पाहिले जाते. दप्तरासोबत आणणाऱ्या पाण्याची बाटलीही रिकामी आणायला सांगून शाळेतील शुध्दीकरण यंत्रणेद्वारे दिले जाणारे पाणी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे पाण्याच्या बाटलीचे ओझेही कमी होण्यास मदत होते.  

शासन निर्णय होण्यापूर्वीच लाहोटी कन्याप्रशालेच्या विद्यार्थिनींना पुस्तके, वह्यांचे ओझे कमी करण्याचे नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे आणखी कमी होण्याच्यादृष्टीने दप्तराची पिशवीही कमी वजनाची असणे आवश्‍यक आहे. त्याचाही विचार होणे गरजेचे आहे. 
-शर्मिला बायस, मुख्याध्यापिका,  लाहोटी कन्याप्रशाला, कऱ्हाड

Web Title: lahoti pattern for school bags