शिरनांदगी तलाव आंदोलन भविष्यात तीव्र होण्याची शक्यता

गुरूदेव स्वामी 
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

भोसे - म्हैसाळच्या पाण्यासाठी शिरनांदगी तलावातच महिला सदस्यानी सुरू केलेल्या आंदोलनामध्ये लोकांची उपस्थिती वाढल्याने आंदोलन भविष्यात तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान शेवटच्या टोकास असलेल्या मंगळवेढ्यास पाणी सोडण्यावरून निश्चित तारखा देताना येताना जलसंपदा विभाग हतबल झाला आहे.

भोसे - म्हैसाळच्या पाण्यासाठी शिरनांदगी तलावातच महिला सदस्यानी सुरू केलेल्या आंदोलनामध्ये लोकांची उपस्थिती वाढल्याने आंदोलन भविष्यात तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान शेवटच्या टोकास असलेल्या मंगळवेढ्यास पाणी सोडण्यावरून निश्चित तारखा देताना येताना जलसंपदा विभाग हतबल झाला आहे.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये मंगळवेढ्याचे हक्काचे पाणी देण्यावर सुतोवाच केले होते. परंतु, ऐन दुष्काळात या भागात अद्यापही पाणी न आल्यामुळे जि.प. सदस्य शैला गोडसे यांनी तलावात ऐन थंडीत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने घेतले नसले तरी लोकांची उपस्थिती मात्र मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. या भागातील शेतकय्रानी जिल्हाअधिकारी राजेंद्र भोसले याची भेट घेऊन पाणी सोडण्याबाबत निवेदन दिले आहे. पाणी जोपर्यंत सोडत नाही त्यो पर्यत आंदोलन सुरू ठेवणार असे सांगितले आहे.

अंकुश खताळ, पांडूरग कांबळे, नामदेव मेडीदार, आबा खांडेकर, संतोष बिराजदार, मनोज खांडेकर, इ. शेतकरी निवेदन दिले. आज कार्यकारी अभियंता विजय पाटील व तहसीलदार आप्पासाहेब संमीदर यांनी भेट दिली. यावेळी तलावामध्ये पाणी सोडण्याबाबत त्यानी अजून पाणी जत व सागो ला तालुक्यात तालुक्यातील पाण्याची मागणी वाढत असल्यामुळे तिथल्या स्थानिक तिथल्या प्रतिनिधीकडून पाणी सोडणे बाबत विचारणा होत आहे. त्यामुळे शिरनांदगी तलावात पाणी कधी येईल हे सांगता येत आहे. दोन वर्षात होणारे काम 6 महिन्यात संपवले यामध्ये आलेल्या अडचणी सोडवल्या झाल्या पण पाणी सोडणे बाबत मात्र अडथळे येऊ लागले आहेत सुरू आहे. त्यावेळी शेतकऱ्यांनी ओढयातील झाडे झुडपे काढण्याची आवश्यकता आहे. कारण ओढा साफ केलातरच पाणी लवकर शिरनांदगी तलावामध्ये येईल नाला साफ करण्यासाठी काही तरतूद केली आहे का. असे शैला गोडसे यांनी विचारण केली. परंतु, त्यासाठी काही तरतूद केली. नाही व काही नियोजन नाही असे उत्तर दिली. त्यांची यावरून पाणी सोडण्याबाबत नकारात्मक भूमिका दिसून आली यावेळी यावेळी उपस्थित होते. पाणी सोडण्याबाबत ठोस काही निर्णय न देता कार्यकारी अभियंता निघून गेले.

ऐन दुष्काळात मंगळवेढ्याच्या हिश्याचे पाणी सोडण्याच्या बाबतीत आदेश होवून जर मिळत नसेल तर शिरनांदगी तलावात पाणी आल्याशिवाय उठणार नाही.
- शैला गोडसे, जि.प.सदस्या

खंडीत होणारा विज पुरवठा, कालव्यातील गळती, गळती रोखताना होणारा वेळ, दुष्काळी परिस्थितीत जत व सांगोल्यात तालुक्यातील शेतकरी व लोकप्रतिनिधीची मागणी यामुळे निश्चित सांगता येईना.
- विजय पाटील कार्यकारी अभियंता

Web Title: lake movement likely to be improve in the future