अक्कलकोट येथे तलाव स्वच्छता मोहीम

राजशेखर चौधरी
रविवार, 8 जुलै 2018

अक्कलकोट : अक्कलकोट येथील जयहिंद फूडबँकेच्या पुढाकारातून शहरातील 14 सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन आज दिवसभर हत्ती तलाव स्वच्छता मोहिम राबविली. ही मोहीम शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते सुरु करण्यात होती. 

अक्कलकोट : अक्कलकोट येथील जयहिंद फूडबँकेच्या पुढाकारातून शहरातील 14 सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन आज दिवसभर हत्ती तलाव स्वच्छता मोहिम राबविली. ही मोहीम शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या हस्ते सुरु करण्यात होती. 

यामध्ये जयहिंद फुडबँक अक्कलकोट, श्री नवश्या गणपती प्रतिष्ठान, शिवशंभू प्रतिष्ठान, श्री संत  कैकय्या महाराज युथ फाऊंडेशन, श्रीराम बहुउद्देशीय संस्था, शिवाजी महाराज चौक,युवा फाउंडेशन करजगी,श्री साई समर्थ प्रतिष्ठान,
वडार समाज सामाजिक संस्था,जयहिंद फुडबँक सोलापूर,रिद्धी सिध्दी प्रतिष्ठान,गोंधळी समाज,श्री विरशेव ककया बहुउद्देशीय सामाजिक संस्था, स्नेहलोक फाऊंडेशन या शहरातील संस्थांचे सक्रिय योगदान राहिले.

अक्कलकोटच्या या राजेकालीन ऐतिहासिक तलावाचे एक आगळे महत्व आणि शहराशी नाते आहे.जेंव्हा जेंव्हा अक्कलकोट शहरावर पाणी संकट ओढवले. तेव्हा या तलावाच्या पाण्यानेच मदतीचा हात दिला आहे.याचे पाझर जवळपास तीस टक्के शहरातील कूपनलिका आणि विहीर यांना वर्षभर होत असते. अलीकडील काळात हे तलाव गाळ, प्लास्टिक, कचरा आणि बाभळीचे झाडे आणि संपूर्ण भिंतीत उगविलेली मोठी झाडे यामुळे या तलावाचे दृश्य अतिशय वाईट आणि घाणीचे साम्राज्य असे होते.

यासाठी जयहिंद फूड बँक अक्कलकोटचे अध्यक्ष अंकुश चौगुले,सतीश तमशेट्टी,हिरा बंदपट्टे,शिवशरण चौगुले,महादेव होटकर आदींनी पुढाकार घेऊन इतर संस्थांची मदत घेत आज स्वच्छतेस प्रारंभ करण्यात आला. आज बऱ्याच गोष्टी पूर्णत्वास गेल्या पण हे तलाव संपूर्ण स्वच्छ होण्यासाठी शहरवासियांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी मदतीचा हात देऊन पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे.

याशिवाय अक्कलकोट शहरातील हत्ती तलाव आणि  त्याभोवतालचा परिसर हा स्वच्छ करून कचरा मुक्त होणार नाही. ही मोहीम आणखी काही दिवस सुरूच राहणार आहे.आज दिवसभर अतिश पवार,अशोक जाधव,उत्तम इगले,किशोर शिदे,प्रशात शिदे,योगेश पवार, मंगेश फुटाणे,ऋषीकेश लोणारी,सचिन कलबुरगी आकाश चौगुले,हणमंत छोत्रे,शिवाजी वाघमोडे,महेश शेड़म,महेश लिंबोळे, पंडित हत्तरकी, वरुण शेळके, सागर माळाबागी, हिरा बंदपट्टे, रोहित घोडके, महादेव होटकर,मालु होटकर,विनायक होटकर,काशिनाथ मलवे,भीमा मलवे आदींनी सहभाग नोंदविला

Web Title: Lake Sanitation Campaign at Akkalkot