धोत्री येथे 24 लाखाचा 276 पोती गुटखा पकडला; उपविभागीय पोलिस अधिकारी यांची मोठी कारवाई

राजशेखर चौधरी
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

स्त्यावरील माळरानावर आतील बाजूस असलेल्या ठिकाणी बेकायदेशीररीत्या गुटखा वाहतूक करून साठा करण्यासाठी ट्रक आणल्याचे निदर्शनास आल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील अशपाक मियावाले, सैपन मुल्ला या दोघांनी पाहणी केली असता सदर ठिकाणी अवैध गुटखा वाहतूक होत असल्याची खात्री करण्यात आली.

अक्कलकोट : उपविभागीय पोलिस अधिकारी अक्कलकोट विभाग प्रीतम यावलकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार धोत्री, ता. दक्षिण सोलापूर येथे अवैधरित्या साठा करण्यासाठी आणलेल्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर धाड टाकून २४ लाखाचा गुटखा पकडला.

सदर ट्रक क्रमांक एम एच ४४ / ९५५५ हा असून धोत्री ते दर्शनाळ रस्त्यावरील माळरानावर आतील बाजूस असलेल्या ठिकाणी बेकायदेशीररीत्या गुटखा वाहतूक करून साठा करण्यासाठी ट्रक आणल्याचे निदर्शनास आल्याने उपविभागीय पोलिस अधिकारी प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील अशपाक मियावाले, सैपन मुल्ला या दोघांनी पाहणी केली असता सदर ठिकाणी अवैध गुटखा वाहतूक होत असल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर त्यांनी तात्काळ वरिष्ठांना सदर बाबीची माहिती दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रीतम यावलकर, दीपक जाधव, महादेव जाधव, सचिन खंडागळे, श्रीकांत जमादार, कपिल काटकर, लक्ष्मण काळजे आदींनी घटनास्थळी जाऊन अवैध प्रकारचे हिरव्या रंगाचे गोवा गुटखा असेलेले एकूण २७६ पोते त्याची अंदाजीत किंमत २४ लाख रुपये इतकी आहे.

संबंधित वाहन व मुद्देमाल तात्काळ ताब्यात घेऊन अक्कलकोट येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय परिसरात लावण्यात आले असून, पुढील कारवाईसाठी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन अधिकारी सोलापूर यांच्या ताब्यात दिलेला आहे. पुढील कारवाई अन्न व औषध प्रशासन अधिकारी सोलापूर हे करीत आहेत. सदर कारवाई ही सोमनाथ वाळुंजकर नुरुद्दीन मुजावर, गोपाल बुकानूरे यांनी केली.

Web Title: lakhs of gutka caught at dhotri Major action of Sub Divisional Police Officer