‘सकाळ’तर्फे २४ पासून लक्ष्य करिअर प्रदर्शने

‘सकाळ’तर्फे २४ पासून लक्ष्य करिअर प्रदर्शने

स्टॉल बुकिंगला प्रतिसाद - पुण्यातील क्रिएटिव्ह ॲकॅडमी मुख्य प्रायोजक

कोल्हापूर - ‘करिअरिस्ट’ विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी काय आहेत, याची सर्वांगीण माहिती यंदाही लक्ष्य करिअर प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे. ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या वतीने २४ मेपासून या प्रदर्शनांना प्रारंभ होत असून, पाच जूनपर्यंत सांगली, कोल्हापूर आणि गडहिंग्लज या ठिकाणी प्रदर्शने होतील. स्टॉल बुकिंगला प्रारंभ झाला असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 

दरम्यान, पुण्यातील क्रिएटिव्ह ॲकॅडमी प्रदर्शनांचे मुख्य प्रायोजक आहे. आठवी ते बारावी सायन्स विद्यार्थ्यांसाठी शाळा-कॉलेजच्या अभ्यासासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय करिअरसाठी संपूर्ण तयारी करून घेणारी ही संस्था गेली दहा वर्षे कार्यरत आहे. आठवीपासूनच आयआयटी फाउंडेशन तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांची तयारी येथे करून घेतली जाते. त्याशिवाय इंजिनिअरिंग व मेडिकल प्रवेश परीक्षांची तयारीही येथे करून घेतली जाते. 

शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर पुढे काय, असा प्रश्‍न बहुतांश विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतो. करिअरच्या दृष्टीने कोणत्या संधी उपलब्ध आहेत, नेमके कोणते कौशल्य हवे आणि त्यासाठी नेमके काय शिकायला हवे, या संभ्रमावस्थेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी अशा प्रदर्शनांची परंपरा ‘सकाळ’ने गेल्या काही वर्षांपासून सुरू केली आहे. त्याला प्रत्येक वर्षी भरघोस प्रतिसाद मिळत असून, यंदाही हे प्रदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांना ‘फॉर राइट चॉइस ऑन राइट टाइम’च ठरणार आहे. 

संगणक, माहिती तंत्रज्ञान, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझाइन, अभियांत्रिकीच्या विविध शाखा, मेडिकल, ॲनिमेशन, बॅंकिंग आदी संस्थांचा समावेश असेल. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांचेही स्टॉल प्रदर्शनात असतील. त्याशिवाय इतर विविध विद्या शाखांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या विविध क्‍लासेसचाही प्रदर्शनात समावेश असेल. प्रदर्शनाच्या कालावधीत करिअर मार्गदर्शन, शिक्षण संधी याबाबत व्याख्याने, चर्चासत्रे, समुपदेशन होणार आहे. 

एकाच ठिकाणी सर्वाधिक पालक व विद्यार्थ्यांपर्यंत विविध शैक्षणिक संधींचा खजिना खुला करण्यासाठी विविध संस्थांनाही हे प्रदर्शन पर्वणी ठरणार आहे. 

अशी होतील प्रदर्शने 
गडहिंग्लज- २४ ते २६ मे (यार्ती बिल्डिंग, आर. के. कॉम्प्लेक्‍सजवळ, कौलगे बाजार, भडगाव रोड, गडहिंग्लज) 
कोल्हापूर- ३० मे ते एक जून (हॉटेल पॅव्हेलियन, मधुसूदन हॉल, कोल्हापूर) 
सांगली- २ ते ५ जून (कल्पद्रुम ग्राउंड, नेमिनाथनगर, सांगली) 
अधिक माहितीसाठी संपर्क- गडहिंग्लज- अनिल मगदूम- ९८८११२९२२७, कोल्हापूर- विजय शिंदे- ९९२२४१६०५५, संतोष पाटील- ९९७५५१३९५१, सांगली- परितोष भस्मे- ९७६६२१३००३, राहुल- ९८२२५३३४५५. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com