‘लक्ष्य करिअर’ला भरघोस प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

सांगली - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने विलिंग्डन महाविद्यालय परिसरात आयोजित ‘लक्ष्य करिअर’ प्रदर्शनास हजारो विद्यार्थी-पालकांनी भेट देऊन भरघोस प्रतिसाद दिला. चार दिवसांच्या प्रदर्शनाची आज उत्साहात सांगता झाली.

सांगली - ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने विलिंग्डन महाविद्यालय परिसरात आयोजित ‘लक्ष्य करिअर’ प्रदर्शनास हजारो विद्यार्थी-पालकांनी भेट देऊन भरघोस प्रतिसाद दिला. चार दिवसांच्या प्रदर्शनाची आज उत्साहात सांगता झाली.

‘लक्ष्य करिअर’ प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट (मिरज) होते. सह-प्रायोजक पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (बुधगाव), डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (जयसिंगपूर), शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (यड्राव), चैतन्य पब्लिक स्कूल (अब्दुल लाट) हे होते. ऑटोमोबाईल पार्टनर्स माई ह्युंडाई, मिलेनियम होंडा (सांगली), ट्राय-कलर होंडा (मिरज), पट्टणशेट्टी होंडा (सांगली) होते.

‘लक्ष्य करिअर’चे अतिशय नेटके संयोजन झाले. भव्य, प्रशस्त मंडपात विविध संस्था, महाविद्यालये, ॲकॅडमी यांच्या स्टॉलची आकर्षक मांडणी केली होती. प्रत्येक स्टॉलसमोर एकाचवेळी अनेक विद्यार्थी, पालकांना  माहिती घेता यावी यादृष्टीने रचना होती. रविवारी सायंकाळी थाटात उद्‌घाटन झाले. तत्पूर्वी सकाळपासून विद्यार्थी-पालकांनी स्टॉलना भेटी दिल्या. 

चार दिवसांच्या प्रदर्शनास सांगली, परिसरातील हजारो विद्यार्थी-विद्यार्थिंनी, पालकांनी भेट दिली. एकाच छताखाली सांगली, मिरज, इस्लामपूर, जयसिंगपूर, इचलकरंजी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बारामती, पुणे परिसरातील नामांकित संस्था, महाविद्यालये, ॲकॅडमीचे स्टॉल होते. त्यामुळे प्रवेशाची अनेक दालने प्रदर्शनातून खुली झाली. दहावी-बारावीत मोठ्या प्रमाणात यश मिळालेल्या विद्यार्थी-पालकांना नेमक्‍या मार्गदर्शनाची  गरज होती. ती या प्रदर्शनातून पूर्ण झाली. शैक्षणिक संस्थांनी प्रदर्शनात एलईडी, लॅपटॉपच्या माध्यमातून विद्यार्थी-पालकांना संस्थेची माहिती दिली. शैक्षणिक सुविधा, जागा, प्रवेश फी आदी सर्वकाही माहिती दिली गेली. संस्थाचालकांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी-पालक यांच्यात संवाद रंगल्याचे चित्र चार दिवसांत दिसले.

काही वर्षांपासून ‘सकाळ’ने दहावी-बारावीनंतर  करिअरच्या वाटा शोधणाऱ्यांना दिशा दाखवण्यासाठी वाटाड्याची भूमिका यशस्वीपणे पार पाडली. यंदाही निकालानंतर ‘लक्ष्य करिअर’ ची प्रतीक्षा लागून राहिली. चार दिवसांच्या भरघोस प्रतिसादातून ते स्पष्टच झाले. एकाच ठिकाणी सर्वकाही माहिती आणि प्राचार्य,  प्राध्यापक मंडळींचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

नव्या वाटांचा शोध...
अभियांत्रिकी, पायलट, ॲनिमेशन आकर्षण.. दहावी-बारावीनंतर अभियांत्रिकी क्षेत्रात असलेल्या विविध संधी, बारावीनंतरचे पदवी अभ्यासक्रम, ॲकॅडमीचे कोर्सेस याबाबत विद्यार्थी-पालक जागरूक दिसले.  पायलट कोर्सबाबत अनेकांनी उत्सुकता दर्शवली. तसेच ॲनिमेशन कोर्सबाबतची पसंती दर्शवली गेली. या व्यतिरिक्त इतर पूरक अभ्यासक्रम, कोर्सेसबाबत प्रदर्शनातून नेमकी माहिती मिळाली. 

Web Title: lakshya career response