ललिता बाबर बनणार उपजिल्हाधिकारी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

मलवडी - माणची वायुकन्या ऑलिंपिक खेळाडू ललिता बाबर-भोसले या उपजिल्हाधिकारी होणार, यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले. 

मलवडी - माणची वायुकन्या ऑलिंपिक खेळाडू ललिता बाबर-भोसले या उपजिल्हाधिकारी होणार, यावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले. 

ललिता बाबर-भोसले यांनी रिओ ऑलिंपिकमध्ये 3000 मीटर स्टिपलचेस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून पहिल्या दहामध्ये येण्याचा मान पटकावला होता. या खेळात नवीन राष्ट्रीय विक्रमही आपल्या नावे केला आहे. या कामगिरीची दखल घेत त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या सचिवस्तरीय समितीने शासकीय सेवेत घेण्याबाबत ललिता यांच्या नावाची शिफारस केली होती. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या शिफारशीस मान्यता दिली. त्यामुळे ललिता यांची उपजिल्हाधिकारीपदावर नियुक्ती होणार आहे. महसूल विभागाच्या मान्यतेनंतर अंतिम नियुक्तीचा आदेश निघणार आहे. 

Web Title: Lalita Babar become Deputy District Collector