चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात दरड कोसळली; वाहतूक बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Landslide at Kumbharli Ghat

चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात दरड कोसळली; वाहतूक बंद

चिपळूण : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाचा (Rain) फटका कुंभार्ली घाटाला देखील बसला आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळं कुंभार्ली घाटानजीक (Khumbarli Ghat) सोनपात्र वळण इथं दरड कोसळण्याची घटना घडलीय.

चिपळूण-कराड मार्गावरील (Chiplun Karad Road) कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याने वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आलीय. या घाटात ज्या ठिकाणी दरड (landslide) कोसळली आहे, तिथं जेसीबीच्या सहायानं दरड बाजूला करण्याचं काम सुरूय. दरम्यान रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलाय.

हेही वाचा: NCP : महाराष्ट्रात सत्ताबदल होताच राष्ट्रवादीचे माजी आमदार भाजपच्या वाटेवर!

पावणेदोन महिन्यांत रत्नागिरीत 55 टक्के पाऊस

कोकणात मोसमी पावसाचे (Ratnagiri Rain) आगमन अनपेक्षितपणे लांबले असले तरीही मागील ४८ दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यात एकूण सरासरीच्या तुलनेत ५५ टक्के मजल मारली आहे. पुढील चार दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ (Rain Yellow Alert) जारी केला असला तरीही सध्या जिल्ह्यात सरींचा पाऊस पडत आहे. भातशेतीसाठी (Paddy) समाधानकारक स्थिती असून आतापर्यंत ६० टक्के लावण्या पूर्ण झाल्या आहेत.

Web Title: Landslide At Kumbharli Ghat On Chiplun Karad Route Bam92

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..