राईनपाडा हत्याकांडातील मृतांवर अखेर अंत्यसंस्कार

हुकूम मुलाणी
मंगळवार, 3 जुलै 2018

मंगळवेढा : धुळे जिल्ह्यातील रईनपाडा हत्यांकांडात मृत्यूमुखी पडलेल्या नाथपंथी डवरी समाजातील तालुक्यातील खवे व मानेवाडी येथील मृतदेह आज सकाळी गावी दाखल झाले. नातेवाईकांतून मारेकऱ्यांबद्दल संताप व आक्रोश केला जात आहे. आरोपींना फाशीची शिक्षा व अन्य मागण्यांवरून मृतांचा अंत्यविधी रोखून धरला. जिल्हाधिकारी राजेन्द्र भोसले यांनी त्यांच्या मागण्यांबाबत लेखी पत्र दिल्यावर उपस्थित नातेवाईकांचा आक्रोश थांबला व अंत्यविधी झाला.

अतिशय क्रुर पद्धतीने हत्या केलेल्या या प्रकरणात राहईनपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, पोलीस पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा, आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, मृतांच्या वारसांना योग्यतेप्रमाणे नोकरी द्यावी व इतर मागण्या याबाबत लेखी पत्र दिल्याशिवाय खवे व मानेवाडीतील मृतांचा अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांना घेतला. 

भोसले यांच्या घरातील दोन कर्ते भाऊ गेल्यामुळे भोसले व मालवे कुटूंबाचा आधारवड गेला. तालुक्यात नाथपंथी डवरी समाजाचे तालुक्यातील कचरेवाडी, शेलेवाडी, गणेशवाडी, पाठखळ, खुपसंगी, जुनोनी, नंदेश्‍वर महमदाबाद हु. मानेवाडी, हुन्नुर, लवंगी, निंबोणी, खवे, जित्ती, शिरनांदगी, रेवेवाडी या गावात असून याशिवाय राज्यातील कानाकोपऱ्यात असलेला समाज बांधव आज खवे गावाकडे धाव घेतली. खवे येथे आ. भारत भालके, जिल्हाधिकारी राजेन्द्र भोसले, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, उपविभागीय अधिकारी दिलीप जगदा तहसिलदार आप्पासाहेब समिंदर,
सभापती प्रदीप खांडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सोमनाथ आवताडे, शिवसेना तालुकाध्यक्ष येताळा भगत, सचिन शिवशरण,
मच्छिद्र भोसले, गोरख इंगोले, अन्य समाज बांधवासह नागरिक मोठ्या संख्येने खवे उपस्थित होते. इथल्या हालचालींवर मानेवाडीतील नातेवाईक व ग्रामस्थ लक्ष ठेवून होते.

Web Title: last rituals on rainpada murdered dead bodies