esakal | सांगली पोलिसांच्या ताफ्यात आता या अत्याधुनिक बाईक...
sakal

बोलून बातमी शोधा

 The latest bikes are now in the custody of the Sangli police ...

विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा तातडीने छडा लागण्यासाठी जिल्हा पोलिस दलात सहा सुसज्ज "आय बाईक' दाखल झाल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी आणि अप्पर पोलिस अधीक्षक मनिषा दुबुले यांच्या हस्ते या बाईकचे उद्घाटन झाले. 

सांगली पोलिसांच्या ताफ्यात आता या अत्याधुनिक बाईक...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली : विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा तातडीने छडा लागण्यासाठी जिल्हा पोलिस दलात सहा सुसज्ज "आय बाईक' दाखल झाल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी आणि अप्पर पोलिस अधीक्षक मनिषा दुबुले यांच्या हस्ते या बाईकचे उद्घाटन झाले. 
कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी इन्विस्टेगेशन बाईक कार्यान्वीत करणेबाबत सुचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे या बाईक दाखल झाल्या आहेत. 

यावेळी डॉ. चौधरी म्हणाले, ""पोलिस दलाचा हा चांगला उपक्रम आहे. कायदा आणि सुव्यवस्था बघत असताना गुन्हेगारीकडे दुर्लक्ष होऊ नये. या यंत्रणेचा पूर्ण क्षमतेने वापर व्हावा. नाविण्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी जिल्हा नियोजनमधून आणखी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.'' 

अप्पर पोलिस अधीक्षक दुबुले म्हणाल्या, ""या बाईकमुळे गुन्ह्यांचे दोषसिध्दीचे प्रमाण वाढवणे, घटनास्थळावरील भौतिक पुरावे शास्त्रीय पध्दतीने गोळा करणे, छायाचित्र, चित्रिकरण करणे या कामी तपासी अधिकारी यांना मदत होणार आहे. उपविभागीय स्तरावर ही आय बाईक देण्यात आली आहे. या पथकातील कर्मचारी विविध पुरावे गोळा करतील, पुराव्याचे योग्य जतन करणे, फॉरेन्सिक लॅबला पाठवायचे नमुने घेणे, फिंगरप्रिट डेव्हलपिंग, सॉफ्टवेअरच्या सहाय्याने मुल्यमापन केले जाणार आहे. त्यासाठी पोलिस दलातील 19 अधिकारी, कर्मचारी 

यांना प्रशिक्षण देऊन त्यांना आवश्‍यक असणारे सर्व साहित्य किट उपलब्ध करून देण्यात आले आहे.'' यावेळी पोलिस उपाधीक्षक संदीपसिंह गिल, पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.