ताजी बातमी ः शिराळा, मिरज  तालुक्‍यात दोघे कोरोना बाधित 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

सांगली ः सांगली जिल्ह्यात आणखी दोघे करोना बाधित झाले आहेत. यामध्ये शिराळा, आणि मिरज तालुक्‍यात रग्ण बाधित झाले  असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे 

सांगली ः सांगली जिल्ह्यात आणखी दोघे करोना बाधित झाले आहेत. यामध्ये शिराळा, आणि मिरज तालुक्‍यात रग्ण बाधित झाले  असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली आहे 

शिराळा तालुक्‍यातील मणदुर येथील 81 वर्षीय पुरुष कोरोणा बाधित झाला आहे. ते मुंबईवरून आलेल्या मुलाच्या संपर्कात होते. शिराळा तालुक्‍यातील मणदुर येथील 81 वर्षीय पुरुष कोरोणा बाधित झाला आहे. ते मुंबईवरून आलेल्या मुलाच्या संपर्कात होते. 

र मिरज तालुक्‍याती दत्त कॉलनी , मालगाव रोड येथील 67 वर्षीय पुरुष कोरोणा बाधित. ते मुंबईवरू आले होते. त्यांच्याच कुटूंबातील सात जण व भाडेकरू म्हणून राहणाऱ्या सात जणांना इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. हा परिसर कंटेमेंट करण्यासाठीचे नियोजन सध्या सुरू झाले आहे.

या मध्ये कचाचित मिरज मालगाव रस्ता हा काही दिवसांकरीता बंद करण्याचे नियोजन सुरू आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली आहे दरम्यान सांगली जिल्ह्यात आता एकून रूग्ण 112 झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latest News: Two corona affected in Shirala, Miraj taluka

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: