सई करणार लावणी स्केटिंग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

‘‘आरबोळे स्केटिंग अकॅडमी अनेक  वर्षांपासून कार्यरत असून विविध विक्रमांची नोंद येथील खेळाडूंनी केली आहे. आणखी एका विक्रमासाठी बाल स्केटिंगपटू सई पेटकर हिने तयार केली आहे.''

सांगली - येथील राहुल आरबोळे स्केटिंग अकॅडमीची बाल स्केटिंगपटू सई शैलेश पेटकर सलग एक तास लावणी स्केटिंग करणार आहे. रविवारी नेमिनाथनगर येथे याचे सादरीकरण होणार असून विश्‍वविक्रमासाठीही नोंदणी करण्यात आल्याची माहिती  प्रा. शिवपुत्र आरबोळे, प्रशिक्षक शैलेश पेटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले,‘‘आरबोळे स्केटिंग अकॅडमी अनेक  वर्षांपासून कार्यरत असून विविध विक्रमांची नोंद येथील खेळाडूंनी केली आहे. आणखी एका विक्रमासाठी बाल स्केटिंगपटू सई पेटकर हिने तयार केली आहे. सलग एक तास लावणी स्केटिंग सादर करणार आहे. या  अकॅडमीतील खेळाडूंनी पहिल्यांदा सांगली ते मुंबई अशी बालस्केटिंग रॅली काढून मंत्रालयात शिवजयंती साजरी करण्याचा उपक्रम केला होता. याचबरोबर गोविंद माने या ३ वर्षांच्या बाल स्केटिंग पटूने सलग १२ तास  स्केटिंगचा विक्रमही केला. यासह सांगली-कोल्हापूर स्केटिंग रॅली तसेच सर्व सामाजिक उपक्रमांत खेळाडू सहभागी झाले आहेत. याचीच प्रेरणा घेऊन नऊ वर्षांची बाल स्केटिंगपटू सई ही सलग एक तास वेगवेगळ्या लावणीवर स्केटिंग डान्सचा विक्रम करणार आहे. यात एकूण अकरा लावण्यांचा समावेश असून न थांबता सई लावणीच्या तालावर स्केटिंगद्वारे नृत्य सादर करणार आहे. रविवार (ता.२४) सायंकाळी चार वाजता नेमिनाथनगरात हा उपक्रम होणार आहे. वंडर बुक, जिनिअस बुक, भारत वर्ल्ड रेकॉर्ड, गोल्डन स्टार वर्ल्ड रेकॉर्ड या चार विश्‍वविक्रम संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.’’

Web Title: Lawani Skating by Sai Petkar