आईला नदीत ढकलून वकिलाची रेल्वेखाली आत्महत्या

आईला नदीत ढकलून वकिलाची रेल्वेखाली आत्महत्या

मिरज - येथील स्वतःच्या आईस कृष्णा नदीत ढकलून वकिलाने सोलापूर रेल्वे मार्गावर आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुनील सुरेश अग्रवाल (वय 48 ) असे आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे.  

दरम्यान, आई पुष्पा सुरेश अग्रवाल (वय 70 ) यांचा मृतदेह कृष्णा नदी पात्रात मिळाला आहे. तर सुनील अग्रवाल यांना जखमी अवस्थेत रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण तेथे त्यांचे निधन झाले.

मंगळवारी सकाळी सुनील अग्रवाल हे सकाळी सात वाजता आईला घेऊन घराबाहेर पडले. अविवाहित असलेल्या सुनील  यांना सातत्याने आई विषयी चिंता वाटत असे. मंगळवारी सकाळी त्यांनी आईलासोबत घेऊन कृष्णा घाट स्मशानभूमीमागे नदीपात्रात ढकलून दिले आणि दुचाकी तिथेच सोडून दिली.

त्यानंतर त्यांनी सोलापूर रेल्वे मार्गावर धावत्या रेल्वे खाली आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचे उपचार सुरू असताना निधन झाले.

त्यांची दुचाकी मंगळवारी ( ता. 30) दुपारी कृष्णाकाठ स्मशानभूमी मागे बेवारस स्थितीत मिळाली. यावेळी दुचाकीजवळ महिलेच्या चपलाही मिळाल्या. दुचाकीच्या क्रमांकावरून पोलिसांनी शोध घेतल्यानंतर ही दुचाकी दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर निघाली. परंतु त्यांनी ही दुचाकी आपण सुनील अग्रवाल या वकिलांना दिल्याचे सांगितले. त्यानंतर सुनील अग्रवाल यांच्या घरी चौकशी केली असता ते आईला सोबत घेऊन मंगळवारी सकाळीच घराबाहेर पडल्याचे समजले.

दरम्यान पुष्पा अग्रवाल यांचा मृतदेह मंगळवारी सायंकाळी कृष्णा नदीत मिळाला. त्यानंतर काही वेळातच सुनील अग्रवाल यांच्या अपघाती मृत्यूची मिरज रेल्वे पोलिसात नोंद झाल्याचे शहर पोलिसांना समजले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com