"या' नेत्याने म्हटलं, "मैं हूँ ना' 

संतोष कानगुडे 
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

राजकीय जाणकारांच्या उंचावल्या भुवया 
बार्शी शहरातील नगरपालिका आवारात लावण्यात आलेल्या अभिनंदनपर डिजिटल फलकाने नुसतेच सर्वांचे लक्ष वेधून घेतले नाही तर राजकीय जाणकारांच्या भुवयाही उंचावल्या आहेत. 

पानगाव (सोलापूर) : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर ठिकठिकाणी अभिनंदनाचे फलक झळकले. महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांतही शिवसेनेच्या वतीने आनंदोत्सव साजरा होत आहे, परंतु बार्शीतील माजी मंत्री दिलीप सोपल यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी चक्‍क फलकाच्या माध्यमातून "मैं हूँ ना' असे म्हटले. 

हेही वाचा : सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला धक्‍का बसणार का?

उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचा आनंद बार्शीतही साजरा करण्यात आला. या आनंदाचाच एक भाग म्हणून बार्शीत अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन करणारे डिजिटल फलक, फ्लेक्‍स लावण्यात आले. त्यापैकी सध्या बार्शी शहरातील नगरपालिका आवारात लावण्यात आलेला अभिनंदनपर डिजिटल फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामागचे कारणही तसेच आहे, ते म्हणजे त्यावरील "मैं हूँ ना' हे वाक्‍य शहरासह तालुक्‍यात भलतेच चर्चेत आले आहे. माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या या फलकावरील "मैं हूँ ना' या वाक्‍याचा अर्थ नागरिकांनी कसा घ्यायचा, याबाबत राजकीय जाणकारांना विचारले असता त्यांनी याचे दोन अर्थ निघतात असे स्पष्ट केले. 

हेही वाचा : भारताच्या पाच खेळाडूंचा मुख्य फेरीत प्रवेश

एक अर्थ म्हणजे... 
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत दिलीप सोपल यांचा पराभव झाला असून पराभवामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी आणि आगामी निवडणुकीत त्यांनी जोमाने काम करावे म्हणून त्यांना बळ देण्यासाठी सोपल यांनी "मैं हूँ ना' असे म्हटले असावे... 

दुसरा अर्थ म्हणजे... 
सोपल यावेळची विधानसभा निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढवली आणि पराभूत झाले. पण, राज्यात आता शिवसेना केवळ सत्तेतच नव्हे तर मुख्यमंत्रीही शिवसेनेचा झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांच्या झालेला पराभवाची पक्षाने दखल घेऊन त्यांना पक्षश्रेष्ठींनी मनोधैर्य वाढवण्यासाठी "मैं हूँ ना' असा संदेश तर दिला नाही ना! हाही अर्थ यामागे दडलेला असेल आणि असे असेल तर सोपल यांना पक्षात एखादी महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तेव्हा या "मैं हूँ ना'चा दोन्हीपैकी नेमका अर्थ काय असेल? याची उत्सुकता यानिमित्त नागरिकांमध्ये आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The leader said, "I am."