युतीची सभा कोल्हापुरात अन् गर्दीसाठी जनता कर्नाटकातून (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मार्च 2019

कोल्हापूर - कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील शिवसेना- भारतीय जनता पक्षासह महायुतीचा प्रचार प्रारंभ काल कोल्हापूर येथे विराट सभेने झाला. पण या सभेसाठी विराट गर्दी ही शेजारच्या राज्यातून आणली होती, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेस तसेच आमदार नितेश राणे यांनी ट्विटद्वारे केला आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडायला बाहेरच्या राज्यातून लोक गोळा करावे लागतात. यावरून भाजप-शिवसेनेवरचा जनतेचा विश्वास उडाल्याचे स्पष्ट होते. एकमेकांवर तोंडसुख घेण्याची एकही संधी न सोडणाऱ्या भाजप - शिवसेनेने सत्तेच्या लालसेपायी केलेल्या युतीला महाराष्ट्रातील जनतेने नाकारले आहे. असे महाराष्ट्र काँग्रेसने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

तर आमदार नितेश राणे यांनी नेते महाराष्ट्रातील...तर लोक कर्नाटकातील अशी टीका त्यांनी ट्विटद्वारे केली आहे. 

Web Title: Leaders from Maharashtra crowd form Karnataka BJP - Shivsena alliance Sabha