अस्तित्वात नसलेल्या सुतगिरणीसाठी नेत्यांनी कसली कंबर 

हुकूम मुलाणी 
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

मंगळवेढा - मंगळवेढा तालुक्यात अस्तित्वात नसलेल्या सहकारी सुतगिरणीच्या पंचवार्षीक निवडणूकीसाठी तालुक्यातील नेत्यांनी कंबर कसली असून, निवडणूक जरी सुतगिरणीची असली तरी बांधणी मात्र पुढील निवडणुकीच्या दृष्टीने आहे.

स्व.बंडू लाळे यांनी स्व. रतनचंद शहा, स्व.कि.रा.मर्दा, स्व.शंकर चौगुले, स्व.शिवाजी ठेंगील यांच्या मदतीने तालुक्यातील बेरोजगार तरुणांच्या हाताला तालुक्यातच काम मिळावे म्हणून मंगळवेढा तालुका सहकारी सुतगिरणीची उभा करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी रस्ता नसलेल्या गावात जावून सभासद गोळा केले. यामध्ये 2700 सभासदाचे 27 लाख रू भागभांडवल जमा झाले. 

दरम्यान मुख्य प्रवर्तक स्व.बंडू लाळे यांच्या अकाली निधनानंतर यामध्ये काहीच प्रगती झाली नाही. उलट भांडवलात वाढ होत दिड कोटीपर्यत गेले व संस्थेच्या नावे असलेली 86 एकर जमीन सुरक्षित राहिली असली आतापर्यत निवडणूका होत गेल्या पण सुतगिरणीची उभा झाली नाही. तेवीस वर्षे झाली लाळे यांनी कमी वयात केलेले सभासद वयोवृध्द झाले, तर काही मयत झाले. सभासदांना आतापर्यत मतदान शिवाय काहीच करता आले नाही. यंदाची पंचवार्षीक निवडणूक मात्र बबनराव आवताडे यांनी लक्ष घातल्याने चुरशी होवू लागली. तर विरोधात आ. भारत भालके यांनीही यात उडी घेतली. निवडणूकीत सुतगिरणीवर निशाणा मात्र आवताडे वर साधला गेला. आवताडे यांनी कृषी उत्पन बाजार समिती, कृषी उदयोग संघ, खरेदी विक्री संघ या संस्था ठिकवून ठेवल्याने सुतगिरणीवर वर्चस्व मिळावे म्हणून बबनराव आवताडे प्रयत्न करत आहेत, तेहवीस वर्षानंतरही सुतगिरणीची निवडणूक होत आहे. तरीपण सुतगिरणी कधी सुरु होणार याविषयी सभासदांना ठोस सांगीतले नाही. सभासदांना त्यांच्या हयातीत सुतगिरणी वास्तू पाहण्यास मिळणार की नाही याविषयी चर्चा रंगू लागली. संस्थेचे सभासद करत असताना लाळे यांनी तालुक्यात उदयोग उभा राहणे हा हेतू ठेवला होता. आता सूतगिरणीची उभारणी होईल का या विषयी साशकता आहे. मात्र जागा भागभांड्वल दफ्तर हे आतापर्यंत सुरक्षित असून, संस्थेच्या भविष्यात उभारणीबद्दल सभासदात विचार मंथन सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

Web Title: Leaders ready of non-existent sutgirni election