लढा दुष्काळाशी : चामड्याचा बाजार संकटात..! (व्हिडीओ)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 मे 2019

आटपाडीत चामडी व्यवसाय नेमका कशामुळे अडचणीत आला आहे याविषयी जाणून घेतले असता खाटीक बांधवांची व्यथा पुढे आली.

आटपाडी (सांगली) : या गावात मोठ्या प्रमाणात बाजार भरत असूनही सांगलीत केवळ दुष्काळी म्हणून हे गाव आता राहीले आहे. येथे 'सकाळ'च्या टीमने 'लढा दुष्काळाशी' या फेसबुक लाईव्ह निमित्त स्थानिकांशी केलेल्या संवादातून चामड्याचा व्यवसाय अडचणीत आला असल्याचे कळले. हा व्यवसाय नेमका कशामुळे अडचणीत आला आहे याविषयी जाणून घेतले असता खाटीक बांधवांची व्यथा पुढे आली.

येथील खाटीक बांधव म्हणाले, 'सरकारने चामड्याच्या दराला 18 टक्के जीएसटी लावला आहे. आम्हा व्यवसायिकांना तर 18 टक्के ज्यादा द्यावा लागतोच पण गिऱ्हाईकांनाही 18 टक्के जीएसटी आहे. त्यामुळे एका चामड्याला 36 टक्के जीएसटी भरावा लागतो. त्यामुळे चामडी खरेदी खूप कमी झाली आहे. खरेदी-विक्रीच कमी झाल्याने चामडीचा भाव 250 रुपयावरुन 20 रुपये इतका घसरला आहे. शेतकरी, ग्राहक आणि आम्ही अशी आमची साखळी आहे. सरकारची धोरणं याला जबाबदार आहेत.' 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leather market of Atpadi Sangli in crisis because of drought