खंडपीठाच्या आंदोलनाचे नेतृत्व सोडले - एन. डी. पाटील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

कोल्हापूर - "आत एक व बाहेर एक' अशी भूमिका मला मान्य नाही. मी 70 वर्षांत असले राजकारण केले नाही. "कोल्हापूर बंद'च्या इशाऱ्यासह खंडपीठ कृती समितीने शुक्रवारच्या (ता. 7) बैठकीत केलेले सर्व ठराव आपल्याला मान्य नाहीत, असे रोखठोक मत मांडत आजपासून आपण या आंदोलनाचे नेतृत्व सोडत असल्याचे ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.

खंडपीठ कृती समितीच्या सहा जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांनी आज झालेल्या बैठकीत साखळी उपोषण 15 जूनपर्यंत मागे न घेता स्थगित केले. याचवेळी सर्वपक्षीय खंडपीठ कृती समितीने 15 जूनपर्यंत सर्किट बेंचचा निर्णय न झाल्यास "कोल्हापूर बंद'चा इशारा दिला. या वेळी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या प्रा. पाटील यांचे मत विचारात घेतले गेले नाही. त्यामुळे प्रा. पाटील यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली.

Web Title: Left the bench to lead the movement