‘पदवीधर’साठी ७२ हजार ‘शिक्षक’साठी १९ हजार मतदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Legislative Council election graduates and teachers Constituency

‘पदवीधर’ साठी ७२ हजार ‘शिक्षक’ साठी १९ हजार मतदार

बेळगाव : आगामी विधान परिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघात ७२ हजार आणि शिक्षक मतदारसंघामध्ये १९ हजार मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. १३ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान आहे. तर मतमोजणी १५ जूनला आहे.

निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात विधान परिषदेची निवडणूक घोषित करत मतदार यादी जाहीर केली. मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्याची प्रक्रिया, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसांपर्यंत चालणार आहे. मात्र, सध्या पदवीधर मतदारसंघात ७२ हजार मतदारांना मतदानाचा हक्क बजाविता येणार आहे. शिक्षक मतदारसंघात १९ हजार मतदारांना मतदानाचा हक्क बजाविता येईल.

मागील ६ महिन्यांपासून विधानपरिषद निवडणुकीची तयारी सुरू आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी मतदार यादी तयार केली जात आहे. पदवीधर मतदारसंघाच्या अखत्यारीत बेळगाव, बागलकोट आणि विजापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. पदवीधर मतदारसंघात ७२ हजार ६७४ मतदारांना मतदानाचा हक्क बजाविता येणार आहे.

त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील ३१ हजार ४८६, बागलकोट २६ हजार ३४२ व विजापूर जिल्ह्यातील १४,८४६ मतदारांचा समावेश आहे. त्यात पुरुष मतदारांची संख्या ५२,१०४ आणि महिला मतदारांची संख्या २० हजार ५६४ आहे. शिक्षक मतदारसंघामध्ये १९ हजार ५०५ मतदार असून, यात बेळगाव जिल्ह्यातील मतदारांची संख्या ९ हजार ३५५ आहे. बागलकोट ४ हजार ६३८, विजापूर जिल्ह्यातील ५,५१२ मतदारांचा समावेश आहे. त्यात पुरुष मतदारांची संख्या १३ हजार ६५३ व महिला मतदार ५,८५२ इतके आहेत. इतर मतदार मतदारसंघात नसल्यामुळे त्यांचा आकडा शून्य आहे.

राजकीय पक्षांना यादी सुपूर्द

विधान परिषद निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून गेल्या महिन्यात राजकीय पक्षांची बैठक प्रादेशिक आयुक्तांनी घेतली. त्या बैठकीत मतदान केंद्र, मतदारांची यादीची माहिती देण्यात आली. त्यासोबत आता निवडणूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियोजन सुरू आहे.

Web Title: Legislative Council Election Graduates And Teachers Constituency

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top