विधान परिषदेत काँग्रेसला मात देण्यासाठी रमेश जारकीहोळी भाजपच्या पाठीशी :Ramesh Jarkiholi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ramesh jarkiholi cd  case

मंत्रिपदासाठी लाॅबिंग केलेले नाही. विरोधी गटातील काही नेत्यांशी माझे वैयक्तीक संबंध आहेत.

विधान परिषदेत काँग्रेसला मात देण्यासाठी जारकीहोळी भाजपच्या पाठीशी

अथणी (बेळगाव) : विधान परिषद निवडणुकीत जारकिहोळी बंधूंना वैयक्तीक स्वातंत्र्य आहे. मी मात्र भाजप उमेदवाराच्या पाठीशी खंबीर आहे, असा विश्वास माजी मंत्री आमदार रमेश जारकिहोळी (Ramesh Jarkiholi) यांनी अथणी येथे पत्रकार बैठकीत बोलताना व्यक्त केला. अथणी-कागवाड (Athani-Kagwad) तालुक्यात अनेक ग्रामपंचायत सदस्यांना भेटून आल्यानंतर ते बोलत होते. या निवडणुकीत मी भाजपाच्या पाठीशी राहीन, मात्र काँग्रेस उमेदवारास पराभूत करण्याची जिद्द आहे.

पक्षाच्या आदेशाचे मी पालन करणार आहे. वरिष्ठ ज्यावेळी मंत्री करतील त्यावेळी स्वीकारण्यास तयार आहे. आपण मंत्रिपदासाठी लाॅबिंग केलेले नाही. विरोधी गटातील काही नेत्यांशी माझे वैयक्तीक संबंध आहेत. पक्षाचे काम आल्यास पक्षाच्या बाजून राहीन. आपण आमदार राजू कागे यांना भेटलो म्हणून काय चुकीचे आहे.

नगरपालिका निवडणुका घोषणा झाल्या आहेत. परंतु सरकारने आपली बाजू न्यायालयात मांडून डिसेंबर ऐवजी मार्चमध्ये झाले तर बरे होईल. विधानपरिषद निवडणुकीसाठी संपूर्ण बेळगाव जिल्हा दौरा करत आहे. सर्वाधिक मताने पक्षाच्या उमेदवारास निवडून आणले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. आपल्या बंधूविषयी बोलण्याचे त्यांनी टाळले.

loading image
go to top