नवीन चेहऱ्यांच्या संधीसाठी विधानपरिषद लढवणार नाही : वीरकुमार पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन चेहऱ्यांच्या संधीसाठी विधानपरिषद लढवणार नाही : वीरकुमार पाटील

नवीन चेहऱ्यांच्या संधीसाठी विधानपरिषद लढवणार नाही : वीरकुमार पाटील

निपाणी (बेळगाव) : बेळगाव जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण विधानपरिषद निवडणूकीसाठी पक्ष श्रेष्ठींकडे मागणी केली होती. पण नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी आपण विधानपरिषद निवडणूक लढविणार नसल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगून आगामी लोकसभा किंवा राज्यसभेत या भागाचे लोकप्रतिनिधीत्व करण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगितले आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेतील, असा विश्वास माजी मंत्री व केपीसीसीचे उपाध्यक्ष वीरकुमार पाटील यांनी व्यक्त केला.

निपाणी येथे शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी चिक्कोडी जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, निपाणी ब्लॉक कॉग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे वीरकुमार पाटील म्हणाले, मी कॉंग्रेस पक्षाकडे विधानसभा आणि विधानपरिषद करीता ७ वेळा उमेदवारी मागितली व पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली. त्यामुळे मी दोन्ही सभागृहात २८ वर्ष कामकाज केले आहे. यावेळी विधानपरिषदेकरीता इच्छूक म्हणून पक्षश्रेष्ठींकडे अर्ज दाखल केला होता. पण आपणहून नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी आपण यावेळी माघार घेतली आहे.

हेही वाचा: राज ठाकरे-शरद पवार भेटीत 'लालपरी'बाबत काय झाली खलबतं?

त्यामुळे मी लोकसभा अथवा राज्यसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक आहे. याकरीता राज्याचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार , ज्येष्ठे नेते माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या, मल्लिकार्जुन खर्गे, केपीसीसी कार्याध्यक्ष सतिश जारकिहोळी यांच्याकडे विनंती केली आहे. त्यानुसार आपण राष्ट्रीय पातळीवर काम करण्यास इच्छूक आहोत. त्यानुसार पक्षश्रेष्ठी आपल्या इच्छेचा जरूर विचार करतील . पक्षाने संधी दिल्यास आपण या भागाच्या विकासात हातभार लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

loading image
go to top