वंचित बहुजन आघाडीमुळे मंगळवेढ्यात विधानसभेची गणिते बदलणार

दावल इनामदार
सोमवार, 22 एप्रिल 2019

ब्रह्मपुरी (सोलापुर) - सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून तिरंगी लढत होणार आहे. यावेळी प्रथमच वंचित बहुजन आघाडी उमेद्वारामुळे प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवाराला डोकेदुखी होणार असे चित्र आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता मंगळवेढाकरांना वाटू लागली आहे.

ब्रह्मपुरी (सोलापुर) - सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून तिरंगी लढत होणार आहे. यावेळी प्रथमच वंचित बहुजन आघाडी उमेद्वारामुळे प्रतिस्पर्धी असलेल्या उमेदवाराला डोकेदुखी होणार असे चित्र आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता मंगळवेढाकरांना वाटू लागली आहे.

लोकसभेची निवडणूक मतदान झाले असले, तरी कुठल्या तालुक्यातून कोणाला मताधिक्य जाईल? याची चर्चा पे चर्चा सुरु आहे. जो तो आपल्या परीने आमच्या पक्षाचा खासदार होईल असे शहरी, ग्रामीण भागात ठासून सांगत आहेत. परंतु, लोकसभा निवडणूक उमेदवाराच्या भोवती संपूर्णतः जातीय समीकर्णावर गेली असलीतरी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचे नांदी असून तालुक्यातील जातीय समीकरणे बदलली आहेत.

लोकसभा निवडणुकीमुळे यावेळेस होणारी विधानसभा निवडणूक व्ही. बी. ए.मुळे काट्याची लढत होईल असे चित्र दिसू लागले आहे.

मंगळवेढा तालुका व ग्रामीण भागात काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे, भाजपचे श्री जयसिद्धेश्वर महाराज व वंचित बहुजन आघाडी कडून ऍड प्रकाश आंबेडकर यांनी तालुक्यातील ग्रामीण भागात व शहरी भागात राजकीय नेत्यांनी सभेचे नियोजन करुण धुरळा उडवला आहे. प्रत्येकजण जनतेपर्यंत पोहोचण्यास यश आले असले, तरी येणाऱ्या विधानसभेला वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेत निवडणुकीत विधानसभेची तयारी करीत आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी राजकीय पक्षांना असणारा मतदार हा ग्रामीण, शहरी भागात वंचित बहुजनाची मते निर्णय असून, येणारी विधानसभेचा आमदार वंचित बहुजन आघाडी आघाडीचा असेल असे जाहीर सभेच्यावेळी  करण्यात आले. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांना डोकेदुखी झाली आहे. 

मंगळवेढा तालुक्यात ग्रामीण भागात प्रबळ असलेल्या धनगर समाज, दलित समाज, इतर मागास वर्गीय यांच्या समीकरणामुळे गणिते बदलत असली तरी येणाऱ्या विधानसभेला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणूक ही चुरशीची होणार आहे. आतापासूनच राजकीय गणिताची सूत्रे मांडू लागले आहे. तालुक्यातील असणारे साखर कारखाने व कामगार वर्ग दुष्काळामुळे झपाटला असल्यामुळे लोकसभा निवडणुकीत पाण्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न आदी मुद्दे उमेदवारांनी मांडण्यात आली व विकास कामे करण्याची अशी तीन्हीही उमेदवाराने आश्वासने देण्यात आली. त्यामुळे पंढरपूर  विधानसभा निवडणूक ही अता अड़चणीची झाली असून जो उमेदवार विकासकामे करेल त्या जोरावरच या मतदार संघात आमदार होईल असे चित्र निर्माण झाले आहे.

Web Title: Legislative votes will change in the Mangaldas due to the vanchit Bahujan alliance