बिबट्याचे जनावरांवर हल्ल्याचे सत्र सुरूच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 नोव्हेंबर 2018

विंग - पाळीव जनावरांवर बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र येथे अद्याप सुरूच आहे. काल (ता. 11) रात्री बिबट्याने पुन्हा हल्ला करून दोन शेळ्या ठार केल्या. एका शेळीला जखमी केले. भरवस्तीत हल्ला केल्याने शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. आठवड्यात ही तिसरी घटना असून वन विभागाकडून बंदोबस्ताची मागणी होत आहे. 

विविध परिसरात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र येथे कायम आहे. वस्ती परिसरात हल्ल्याच्या घटना अनेकदा घडल्या. मात्र, तो आता भरवस्तीत घुसू लागल्याचे चित्र आहे. काल रात्री त्याने हल्ला करून दोन शेळ्या ठार केल्या, तर एकीला जखमी केले आहे. निवृती रामा यादव यांच्या शेळ्या होत्या. विशेषतः शेळ्यांना त्याने लक्ष्य केले आहे. दोन्ही शेळ्यांच्या गळ्याला चावा घेतल्याचे दिसत आहे. घटनेजवळ शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे उमटले आहेत. मादीबरोबर तिचे बछडे असण्याची शक्‍यता आहे. तत्पूर्वी शनिवारी (ता.10) होगले वस्ती परिसरात हल्ला करून बिबट्याने शेळी ठार केली होती. एका आठवड्यातेल ही तिसरी घटना आहे. सलग दोन रात्री बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. भीतीपोटी रात्रीच्यावेळी शेतीच्या पाण्यावर जायला शेतकरी घाबरू लागले आहेत. बंदोबस्ताची मागणी कायम आहे. याबाबत संबंधितांनी वन विभागाला कळवले आहे. 

Web Title: Leopard on the attack animals