बिबट्यासदृश प्राण्याच्या हल्ल्यात बालक ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) - ऊसतोडणीसाठी नंदुरबार येथून आलेल्या अनिता लालसिंग तडवी या कुटुंबातील चार महिन्यांच्या मुलावर बिबट्यासदृश प्राण्याने हल्ला केला. मुलाच्या आईने आरडा-ओरड केल्याने अर्धवट खाल्लेल्या मुलाचे शरीर टाकून या प्राण्याने धूम ठोकली.

गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकरिता ऊसतोडणीसाठी नवनाथ झांबरे (रा. देवडे, ता. पंढरपूर) यांची टोळी आली आहे. ही टोळी हरिदास गणपत पाटील यांच्या घराशेजारील शेतात उतरली होती.

सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कोपटांच्या समोर असलेल्या चार महिन्यांच्या मुलाला आपल्या जबड्यात बिबट्यासदृश प्राण्याने उचलले, हा प्रकार समजताच त्याची आई अनिताने आरडाओरड सुरू केली. हे ऐकून गणपत पाटील व हरिदास पाटील या पिता- पुत्राने टोळीकडे धाव घेतली, तर त्या ठिकाणी त्या प्राण्याने बाळाचे तोंड जबड्यात धरल्याचे दिसले. त्यांनीही ओरडायला सुरवात केली तेव्हा आजूबाजूचे लोकही धावत येऊ लागले. याची चाहूल लागताच अर्धवट खाल्लेले शरीर टाकून त्या प्राण्याने धूम ठोकली. या हल्ल्यात ते बालक जागीच ठार झाले होते.

Web Title: Leopard attack on child