करमाळा तालुक्यात बिबट्या जेरबंद

अण्णा काळे
रविवार, 26 ऑगस्ट 2018

या ठिकाणी वन विभागाच्या अधिका-यांनी भेट देऊन पहाणी केली, माञ ठसे नेमके कशाचे हे समजू शकले नव्हते. माञ नागरीकांच्या आग्रहाखातर या परीसरात पिंजरा लावण्यात आला. 

करमाळा : उंदरगाव (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथे बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाच्या वतीने लावलेल्या पिंज-यात रविवारी (ता. 26) पहाटे बिबट्या अडकला आहे. 
3 जुलैला उंदरगाव येथिल कैलास कोकरे यांना राञी दहाच्या सुमारास बिबट्या दिसला होता. तेव्हापासुन या परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

या ठिकाणी वन विभागाच्या अधिका-यांनी भेट देऊन पहाणी केली, माञ ठसे नेमके कशाचे हे समजू शकले नव्हते. माञ नागरीकांच्या आग्रहाखातर या परीसरात पिंजरा लावण्यात आला. 

काही दिवसांपूर्वी पारेवाडी परीसरात एका शेळीवर हल्ला केला.नंतर राजुरी परीसरातील ही शेळी बिबट्याने खाल्ली. माञ वन विभागाने ही बाबत आवश्यक तेवढी गांभीर्याने न घेतल्याने लोंकामध्ये नाराजीचा सुर होता. बिबट्याच्या जेरबंद झाल्याने नागरीकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

Web Title: leopard captured in Karmala