माका-महालक्ष्मी हिवरे शिवारात बिबट्या जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

नेवासे : गेल्या सहा-सात महिन्यांपासून माका-महालक्ष्मी हिवरे (ता. नेवासे) परिसरात धुमाकूळ घालणारा नर बिबट्या बुधवार (ता. 22) रोजी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास माका शिवारात असलेल्या केदारे वस्तीजवळ जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. या ठिकाणी पंधरा दिवसांपूर्वी वनविभागाने पिंजरा लावला होता. माका, महालक्ष्मी हिवरेसह शिवाराच्या गावातील शेतकर्‍यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. बिबट्याच्या भीतीमुळे शेतीच्या कामांवर मोठा परिणाम झाला होता. 

या बिबट्याने गेल्या सहा महिन्यांपासून महालक्ष्मी हिवरे, माका शिवारात धुडगूस घालून अनेकांच्या शेळ्या, वासरे व कुत्र्यासह एक गाय या पाळीव प्राण्यांसह कोल्हे, लांडगे व मोरांचा फडशा पाडला. या परिसरातील गणेश भोये यांच्या एका गायीचा रात्री तर मच्छिंद्र लोंढे यांच्या शेळीचा बिबट्याने भरदिवसाच फडशा पाडला होता. दिवसेंदिवस या बिबट्याची दहशत वाढतच चालल्याने या परिसरातील नागरिकांनी वन विभागाशी संपर्क साधून पिंजरा लावण्याची मागणी केली होती. पंधरा दिवसांपूर्वीच महालक्ष्मी हिवरे परिसरात केदारे वस्ती जवळ पिंजरा लावण्यात आला होता. पिंजऱ्यात लावण्यात आलेल्या भक्ष्याच्या मोहाने पहाटे तीनच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला.
    अंदाजे सातवर्ष वय असणार्‍या या बिबट्याने जेरबंद झाल्यावर मोठ-मोठयाने दिलेल्या डरकाळ्या परिसरात घुमू लागल्याने जेरबंद बिबट्याला पहाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. याची माहिती समजताच वन विभागाचे कर्मचार्‍यांनी पिंजऱ्यासह बिबट्याला ताब्यात घेवून त्याला लोहगाव (ता. नेवासे) येथील वनविभागाच्या रोपवाटीकेत ठेवण्यात आले. 

Web Title: Leopard catch in birdcage