मांगले परिसरात बिबट्या सापळ्यात पकडला...वनविभागाने सुरक्षित ठिकाणी सोडले 

भगवान शेवडे 
Thursday, 1 October 2020

मांगले (सांगली)-  गेले काही दिवस मांगले परिसरात दहशत निर्माण करणारा बिबट्या येथील बांबर डोंगर परिसरात वनविभागाने लावलेल्या सापळ्यात आज पहाटे अडकला. 

मांगले (सांगली)-  गेले काही दिवस मांगले परिसरात दहशत निर्माण करणारा बिबट्या येथील बांबर डोंगर परिसरात वनविभागाने लावलेल्या सापळ्यात आज पहाटे अडकला. 

गेल्या वर्षभरात पाळीव प्राण्यांसह माणसांवर हल्ला करणा-या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी मांगले ग्रामसभेत व परीसरातील शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात केली होती. बिबट्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सुगीचा हंगाम आणि नागरिकांची मागणी लक्षात घेऊन चार दिवसापुर्वी वनविभागाने सापळा लावला होता. बांबर डोंगर परिसरात लावलेल्या सापळ्यात बिबट्या अडकला काय? याकडे लक्ष होते. आज पहाटे सहाच्या सुमारास बिबट्या सापळ्यात अडकल्याचे काही शेतकऱ्यांनी बघितले. त्यानंतर वनविभागाला कळवले. त्यानंतर वन विभागाच्या 
पथकाने सकाळीच बिबट्याला अन्य ठिकाणी सोडून दिले. मात्र वनविभागाने बिबट्याला सोडल्याचे ठिकाण सांगितले नाही. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून सकाळी सातच्या सुमारास गावात व परिसरात बिबट्या सापळ्यात पकडल्याची बातमी पसरली होती. त्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. बिबट्या सापडल्याचे समजताच सर्वांना दिलासा मिळाला. कारण गेल्याच महिन्यात उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या तीन बिबट्यापैकी एका बिबट्याने मोटर सायकलवरून वैरण घेऊन चाललेल्या शेतकऱ्याच्या अंगावर झेप घेऊन जखमी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard caught in Mangle area. Forest department released it to a safe place