सातारा : वाहनाच्या धडकेने बिबट्याचा बछडा ठार

राजेश पाटील
सोमवार, 13 जानेवारी 2020

मृत बछड्याचे वय अंदाजे सव्वावर्षं आहे. यावेळी त्याच्यासोबत त्याची आईसुद्धा होती. ज्या वाहनाने बिबट्यास धडक दिली. ते काेणते हाेते हे मात्र समजू शकले नाही.
 

ढेबेवाडी : (जिल्हा सातारा) :  एका वाहनाच्या धडकेने बिबट्याचा बछडा जागीच ठार झाल्याची घटना आज (साेमवार) पहाटे गुढे-काळगाव रस्त्यावर धामणी (ता.पाटण) गावाजवळ घडली.

हेही वाचा - ...म्हणून हाेतेय सातारकरांच्यात पून्हा श्रीनिवास पाटलांची चर्चा

वनविभागाचे आधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा व पुढील अन्य कार्यवाही सुरू आहे. काळगाव-धामणी परिसराच्या आजूबाजूला डोंगर व घनदाट झाडी असून वन्यप्राण्यांचा तेथे सतत वावर असतो.

अलीकडे तेथे बिबट्याचा संचारही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. धामणी गावाजवळ आज (साेमवार) पहाटे साडेपाचच्या सुमारास वाहनाच्या धडकेने  बिबट्याचा बछडा जागीच ठार झाल्याची घटना घडली. दाट धुक्यामुळे कदाचीत अंदाज न आल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृत बछड्याचे वय अंदाजे सव्वावर्षं आहे. यावेळी त्याच्यासोबत त्याची आईसुद्धा होती. बछड्याच्या मृत्यूनंतर तिचा आरडाओरडा कानावर आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान ज्या वाहनाने बिबट्यास धडक दिली. ते काेणते हाेते हे मात्र समजू शकले नाही.

नक्की वाचा -  पाटण (जि.सातारा) : बिबट्या पून्हा आला... अन्


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard Dead In Patan Taluka In Accident

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: