राहुरीजवळ वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

रस्ता ओलांडतांना बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. सकाळी सहा वाजता माहिती समजताच वनपाल गोरक्षनाथ लोंढे हे वन खात्याच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

राहुरी फॅक्टरी : धामोरी फाटा (ता. राहुरी) येथे नगर-मनमाड महामार्गावर आज (रविवारी) पहाटे चार वाजता झालेल्या अपघातात तीन वर्षांचा बिबट्या जागीच ठार झाला.

रस्ता ओलांडतांना बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. सकाळी सहा वाजता माहिती समजताच वनपाल गोरक्षनाथ लोंढे हे वन खात्याच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन, मृत बिबट्या बारागाव नांदूर येथील वन खात्याच्या रोप वाटीकेत आणण्यात आला. तेथे बिबट्याची उत्तरीय तपासाची केली जाणार असल्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. राजेंद्र शेटे यांनी सांगितले.

Web Title: leopard died in accident