नगर शहराजवळ बिबट्याचा वावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

बोरूडे मळा परिसरात बिबट्याचे ठसे आढळून आले असून, त्याच परिसरात बिबट्या असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आज तेथे पिंजरा लावण्यात आला आहे.
- देविदास पाचरणे, वनपाल, नगर

नगर : शहराजवळील बोरूडे मळा परिसरात बिबट्याचे वावर आढळून आला असून, वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी आज सायंकाळी पिंजरा लावला आहे. 

बोरूडे मळा परिसर सीना नदीकाठी असून परिसरात मोठ्याप्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. त्यामुळे बिबट्याला दडून बसण्यासाठी चांगलीच जागा आहे. गेल्या चार दिवसांपासून परिसरातील रहिवासी व शेतकरी बिबट्या फिरत असल्याचे सांगत होते. काल वनविभागाच्या पथकाने त्या परिसरात जावून पाहणी केली असता तेथे बिबट्याचे ठसे आढळून आले. तसेच, बिबट्याने एका कुत्रे व रानडुक्कराची शिकार केल्याचे दिसून आले होते. आज सकाळी पुन्हा वन विभागाचे पथक बोरूडे मळा परिसरात गेले असता उसाच्या शेतात बिबट्याचे ठसे आढळून आले तर, कुत्रे व रानकुडक्कर फस्त केल्याचे आढळून आले. त्यामुळे वन विभागने बिबट्याला पकडण्यासाठी आज सायंकाळी बोरूडे मळा परिसरात पिंजरा लावला आहे. परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 

बोरूडे मळा परिसरात बिबट्याचे ठसे आढळून आले असून, त्याच परिसरात बिबट्या असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आज तेथे पिंजरा लावण्यात आला आहे.
- देविदास पाचरणे, वनपाल, नगर

Web Title: leopard at nagar