आजरा तालुक्यातील पेरणोली परिसरात बिबट्याचा वावर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

मातीत आढळलेले पायाचे ठसे हे तरसाचे असावेत. या ठशांमध्ये नखे दिसतात. या प्राण्याने परिसरात कोणता प्राणी मारला आहे का? याबाबत खात्री करून घेतली जाईल.
- एस. के. लाड,
आजरा, परिक्षेत्र वनाधिकारी.

आजरा - पेरणोली (ता. आजरा) येथून दोन किलोमीटरवर असलेल्या वझरे पठारानजीक बिबट्याचा वावर सुरू झाला आहे. वझरे रस्त्यावर मातीत त्याच्या पायाचे ठसे आढळले. खाद्याच्या शोधात तो पेरणोली वझरे रस्त्यावरील बांबर शेत परिसरात आला असावा, असे ग्रामस्थांनी सांगितले. वन विभागाने पायाच्या ठशांवरून ते ‘तरस’ असावे अशी शक्‍यता वर्तवली आहे.

मॉर्निंग वॉकला काही जण वझरे रस्त्याकडे जातात. त्यांना या रस्त्याला लागून जंगलाच्या दिशेने जाणाऱ्या मातीच्या रस्त्यावर आज वन्यप्राण्याचे ठसे मिळाले. हे ठसे बिबट्यासदृश प्राण्याचे असावेत याची खात्री त्यांना झाली. त्यांनी ठशांचे फोटो वन विभागाकडे पाठवून दिले. दरम्यान, चार वर्षांपासून या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे शेतकरी सांगतात. गतवर्षी पांडुरंग सासुलकर यांना याच महिन्यात मोळ परिसरात बिबट्याचे दर्शन झाले होते. दोन वर्षांपूर्वी आनंदा हावलदार यांच्या कुत्र्यांचा बिबट्याने पाठलाग केला होता. 

गव्यांच्या पिलांच्या शोधात
पेरणोली परिसरातील जंगलाला आग लागल्याने वन्यप्राणी मानवी वस्तीकडे सरकू लागले आहेत. गव्यांचे कळप चारा व पाण्यासाठी येत आहेत. आज सकाळी मॉर्निंग वॉकरना गव्यांचा कळप दिसला. या कळपात गव्यांची लहान पिले आहेत. ते बिबट्याचे भक्ष्य आहे. त्यामुळे तो इकडे आला असावा, असे त्यांनी सांगितले.

मातीत आढळलेले पायाचे ठसे हे तरसाचे असावेत. या ठशांमध्ये नखे दिसतात. या प्राण्याने परिसरात कोणता प्राणी मारला आहे का? याबाबत खात्री करून घेतली जाईल.
- एस. के. लाड,
आजरा, परिक्षेत्र वनाधिकारी.

Web Title: Leopard seen in Pernoli in Ajara Taluka

टॅग्स