बिबट्या दिसला पोखर्णीत; तरूणांनी केले कॅमेराबद्ध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

मागील दहा दिवसांपूर्वी बावचीतील धोंडी पाटील मळा, औटी पाणंद येथे वावर होता. येथेदेखील त्याने कुत्र्यांना लक्ष केले. चार दिवसांपूर्वी नलवडे मळा येथील शेतवस्तीवर झाडावरून घरावर उडी मारल्याने घराची कौले फुटली. महिनाभर परिसरात दिसणारा बिबट्या पहिल्यांदाच कॅमेराबद्ध झाल्याने परिसरात बिबट्या आल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला.

बावची : गोटखिंडी व बावची (ता. वाळवा) सह पोखर्णी येथेही बिबट्याच्या वावराने परिसरातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

संतोषगिरी डोंगर परिसरात जासूद खोऱ्यात रात्री युवकांना बिबट्या दिसला. त्यांनी त्याची छायाचित्रे घेतली. ती दिवसभर समाज माध्यमात फिरत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.  जून महिन्यात गोटखिंडीतील टकेश्वर डोंगर परिसरात पहिल्यांदा बिबट्या दिसला. पंधरा ते वीस दिवस मेंढपाळ तळावर व शेत वस्तीवरील कुत्र्यावर हल्ले झाले.

मागील दहा दिवसांपूर्वी बावचीतील धोंडी पाटील मळा, औटी पाणंद येथे वावर होता. येथेदेखील त्याने कुत्र्यांना लक्ष केले. चार दिवसांपूर्वी नलवडे मळा येथील शेतवस्तीवर झाडावरून घरावर उडी मारल्याने घराची कौले फुटली. महिनाभर परिसरात दिसणारा बिबट्या पहिल्यांदाच कॅमेराबद्ध झाल्याने परिसरात बिबट्या आल्याच्या वृत्ताला दुजोरा मिळाला. परिसरातील सर्व शेती बागायत आहे. ऊस पीक मोठ्या प्रमाणात आहे. शेतकरी व मजूर दिवसा शेतात जाण्यास घाबरत आहेत. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. 

Web Title: leopard seen in Walwa