वाळवा तालुक्‍यात येथे बिबट्याचा वावर ? ....ठसे आढळले : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण 

विजय लोहार
Sunday, 6 September 2020

नेर्ले (सांगली)-  पेठ (ता. वाळवा) येथील गावाच्या उत्तर भागातील वारके पाणंद ते अदिती ज्यूस फॅक्‍टरी या परिसरात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. 

नेर्ले (सांगली)-  पेठ (ता. वाळवा) येथील गावाच्या उत्तर भागातील वारके पाणंद ते अदिती ज्यूस फॅक्‍टरी या परिसरात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. 

वाळवा तालुक्‍यातील महामार्गाच्या पश्‍चिमेला पेठ गाव वसले. गावातील शेतकऱ्यांची उत्तरेच्या दिशेला शेती आहे. आज काही शेतकऱ्यांना बिबट्याच्या पायांचे ठसे शेतात आढळून आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे ठसे बिबट्याचे किंवा तरसाचे असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बिबट्या दिसला तर स्वतःहून त्याच्यावर हल्ला करू नये, असे आवाहन वन विभागाचे वनरक्षक दीपाली सागावकर व आर. बी. पाटोळे यांनी केले. जिल्हा परिषदेचे सदस्य जगन्नाथ माळी, रोहित पाटील, महेश कदम, माणिक पाटील, विश्वास जाधव, पांडुरंग पाटील यांच्यासह शेतकरी या परिसरात शेती करतात. 

बिबट्याच्या वावरामुळे स्थानिक शेतकरी व भागातील रहिवासी लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोणत्याही प्रकारची जीवित हानी होण्याअगोदर वन विभागाने आवश्‍यक ती कारवाई करावी. 
- नामदेव खाशेराव कदम (पेठ), संचालक, कृष्णा सहकारी बॅंक 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopards roam here in Valva taluka?