हरित लवादाने केलेला दंड  संबंधितांकडून वसूल करू : महापौर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

हरित लवादाने दिलेल्या सूचनेनुसार घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची कामे लवकर करण्याच्या दृष्टीने संबंधित एजन्सीबरोबर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आज महापालिकेत बैठक घेतली.

नगर : घनकचरा व्यवस्थापनातील कामाच्या दिरंगाईमुळे हरित लवादाने महापालिकेस दंड केल्यास, दंडाची रक्‍कम संबंधित संस्थेकडून वसूल केली जाईल, असे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले. 

हरित लवादाने दिलेल्या सूचनेनुसार घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची कामे लवकर करण्याच्या दृष्टीने संबंधित एजन्सीबरोबर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आज महापालिकेत बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते. नगरसेवक महेंद्र गंधे, संपत बारस्कर, कुमार वाकळे, अजय चितळे, प्रकल्प अभियंता राजेंद्र मेहेत्रे, ठेकेदार हेमंत उपरे, एम. एल. भाटी, रोहित कुराणे उपस्थित होते. 

हेही वाचा - कर्जतच्या तब्लिग इज्तेमाला अलोट गर्दी 

महापौर वाकळे म्हणाले, ""शंभर टन खत प्रकल्पासाठी आवश्‍यक असणारी मशिनरी बसविणे व देखभाल- दुरुस्तीचा कार्यारंभ आदेश औरंगाबाद येथील मायो व्हेसल्स अँड मशिन्स संस्थेला देण्यात आला आहे. मशिनरी बसविण्यासाठी आवश्‍यक असणारे काही काम करण्यात आले आहे. उर्वरित काम 31 जानेवारी 2020 पूर्वी करण्यात येईल. त्यामुळे आपण मशिनरी बसवावी. हे काम 31 जानेवारी 2020पूर्वी पूर्ण करावे, असे "मायो'चे एम. एल. भाटी यांना सांगितले. 

let them recover the fine - the mayor

पुण्यातील पी. एच. जाधव संस्थेकडे एक लाख घनमीटर कचऱ्यावर बायोमायनिंगद्वारे प्रक्रिया करण्याचे काम सुरू आहे, असे महापौर वाकळे यांनी सांगितले. 

मुंबईच्या मीरा क्‍लिनफ्युएल संस्थेकडे पाच टीपीडी क्षमतेचे दोन बायोमिथिनायझेशन प्लॅंट उभारणे व एक वर्ष देखभाल- दुरुस्तीचे काम आहे. एका प्लॅंटमध्ये हॉटेल व अन्य ठिकाणावरून जनावरांच्या अवशेषांवर प्रक्रिया व एका प्लॅंटमध्ये खराब भाजीपाल्यावर प्रक्रिया होणार आहे. या कामाबाबत संबंधित एजन्सीचे हेमंत उपरे यांना माहिती विचारली असता, काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, झालेले काम समाधानकारक नसून, प्रकल्पासाठी आवश्‍यक असणारे साहित्यदेखील अद्यापपर्यंत आलेले नाही.

let them recover the fine - the mayor

कामाची पाहणी येत्या 21 रोजी करण्यात येणार आहे. त्यापूर्वी काम पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. काम पूर्ण न झाल्यास हरित लवादाकडून महापालिकेला दंड झाल्यास आपल्या संस्थेकडून वसूल करण्यात येईल, असे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी संबंधितांना सांगितले. 

महापालिका घेणार 
64 नवीन वाहने 

घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी महापालिका नव्या 64 घंटागाड्या खरेदी करणार आहे. या वाहनांच्या खरेदीसाठी "स्वच्छ भारत' अभियानाअंतर्गत आलेल्या 28 कोटी रुपयांच्या निधीतील रक्‍कम वापरण्यात येईल. एक घंटागाडी आज महापालिकेत आणण्यात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: let them recover the fine - the mayor