सातारा दुष्काळमुक्त करू - मुख्यमंत्री

सातारा दुष्काळमुक्त करू - मुख्यमंत्री

रेठरे बुद्रुक -  सातारा जिल्ह्यासह राज्यात असलेला दुष्काळी कलंक पुसून काढण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी पुढच्या पाच वर्षांचा आराखडा तयार केला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

रेठरे बुद्रुक येथील जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, "कृष्णा'चे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले उपस्थित होते. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून साडेचार वर्षांत महाराष्ट्रात कृषी क्षेत्राच्या विकासासाठी दीड लाख कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च केला आहे, असे सांगून श्री. फडणवीस म्हणाले, ""या आधीच्या सरकारने 15 वर्षांच्या कालावधीत कृषीसाठी केवळ 50 हजार कोटी रुपयेच खर्च केले. राज्यातील सर्व प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण केले आहेत. राज्यातील दुष्काळ कायमस्वरूपी हटवणार आहे. सातारा जिल्ह्याची ओळख काय होती. दुष्काळाचा साताऱ्याला लागलेला कलंक आम्ही पुसून टाकू. राज्यातील दुष्काळी कलंक पुसण्यासाठी आराखडा आखला आहे. येत्या पाच वर्षांत तो आराखडा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू.'' आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने साखरेचे दर पडत असतानाही कृष्णा साखर कारखान्याने शेतकऱ्यांना राज्यात सर्वोच्च दर देण्याची कौतुकास्पद कामगिरी केली आहे. गेल्या पाच वर्षांत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कधीही ऊसदरासाठी आंदोलन करावे लागले नाही. राज्य सरकारच्या पुढाकारामुळे सातत्याने ऊस उत्पादकांना 99 टक्के एफआरपीचे पेमेंट करण्यात यश आले आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून दहा हजार गावांमधील कृषी सेवा सोसायट्यांचे रूपांतर ऍग्रो बिझनेस सेंटरमध्ये केले जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारपेठेतील दलालांच्या पिळवणुकीस सामोरे जावे लागणार नाही, राज्य सरकारने साडेचार वर्षांत 16 हजार कोटींच्या विमा रकमेचे वाटप केले आहे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.'' साडेचार वर्षांत अतुलबाबा एकही दिवस घरी स्वस्थ बसलेले नाहीत. एखादा आमदारही जेवढे काम करणार नाही, त्याच्यापेक्षा किती तरी पट जास्त काम त्यांनी कऱ्हाड दक्षिणेत केले आहे. कऱ्हाडच्या लिंक रोडचा प्रश्न शिल्लक आहे. तो लवकरच मार्गी लावू, असे आश्‍वासनही त्यांनी दिले. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, ""कॉंग्रेस पक्ष देशाबरोबरच महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा एकच खासदार निवडून आला. आगामी विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पाहायला मिळेल. कॉंग्रेस व राष्ट्रवादीची इतकी बिकट अवस्था झाली आहे. त्यांच्याकडे विरोधी पक्षनेताही राहिलेला नाही. अशा बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसले यांचे आव्हान पेलवणार नाही. या सरकारमधील अतुल हा मावळा आहे. लोकांचाही युतीवरच विश्‍वास आहे. त्यामुळे आपला विजय निश्‍चित आहे. बुडत्या जहाजात बसणाऱ्यांनी स्वप्ने बघू नयेत.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com