घराघरात ग्रंथालये निर्माण व्हावीत : राजश्री घुले

सुनील गर्जे 
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

कुकाणे (नेवासे) : पुस्तक हे चांगले चरित्र निर्माण करण्याचे साधन आहे. सर्वश्रेष्ट विचारांच्या पुस्तकातून जीवनाला चांगली दिशा मिळते. त्यामुळे पुस्तकासारखा दूसरा गुरू नाही. काळाची गरज ओळखून आज घराघरात ग्रंथालये निर्माण व्हावीत असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष राजश्री घुले यांनी केले.

कुकाणे (ता. नेवासे) येथील विठठल मंदिर सभागृहात संत ज्ञानेश्वर वाचनालय व स्व.भाऊसाहेब देशमुख सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयातील ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचारी कार्यशाळा उदघाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी उपाध्यक्षा घुले या बोलत होत्या. यावेळी माजी आमदार पांडूरंग अभंग, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर, विठ्ठल लंघे, अॅड. देसाई देशमुख, ज्ञानेश्वर वाचनालयाचे अध्यक्ष बाळासाहेब आरगडे उपस्थित होते. 

शालिनी विखे-पाटील म्हणाल्या, "ज्ञानाचे केंद्रबिंदू ग्रंथालयेच आहे. विद्यार्थ्यांत वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न आपण करत आहे." 

अशोक गाडेकर म्हणाले, "आजचा वाचक, सुज्ञ, अभ्यासू, चिकित्सक आहे. ग्रामीण व विशेषता आपापल्या भागातील साहित्यिकांची पुस्तकेही ग्रंथालयात असावीत. भविष्यातील विद्यार्थी घडेल अशी ग्रंथसंपदा ठेवावी."

यावेळी देसाई देशमुख, स्व भाऊसाहेब देशमुख, शिवाजी घुले, विठ्ठल लंघे यांची भाषणे झाली. प्रास्तविक प्रा भाऊसाहेब सावंत यांनी तर स्वागत प्रा शिवाजी घुले यांनी केले. यावेळी उत्तम पाटील, अमोल अभंग, अशोक मिसाळ, पोपट ऊगले उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील ग्रंथालय चालक, कर्मचारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. आभार आयोजक बाळासाहेब आरगडे यांनी केले. 

Web Title: Libraries to be constructed at home: Rajshree Ghule