मिरजेतील खून प्रकरणी दोघांना जन्मठेप

बलराज पवार
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

सांगली - मिरजेतील एका कॅरम क्‍लबमध्ये घुसून अक्रम शेख याचा खून केल्या प्रकरणी दोन आरोपींना आज न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अमीर गौस पठाण (वय 24) व मौजम हुसेन शेख (वय 22) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत.

सांगली - मिरजेतील एका कॅरम क्‍लबमध्ये घुसून अक्रम शेख याचा खून केल्या प्रकरणी दोन आरोपींना आज न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अमीर गौस पठाण (वय 24) व मौजम हुसेन शेख (वय 22) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहेत. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक सात न्या. वर्धन देसाई यांनी शिक्षा सुनावली. सरकारतर्फे अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.

याबाबत अधिक माहिती अशी, मिरजेतील एका कॅरम क्‍लबमध्ये 25 फेब्रुवारी 2015 रोजी अमीर गौस व मौजम हुसेन शेखसह इतर चार अनोळखी इसमांनी पिस्तुलाने गोळीबार करुन आणि कुकरीचे वार करुन अक्रम शेख याचा दिवसाढवळ्या खून केला होता. या प्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक शिवाजी आवटे यांनी तपास केला होता. त्यांनी अमीर गौस पठाण व मौजम हुसेन शेख यांना अटक केली होती. त्यांच्याविरोधात सबळ पुरावे गोळा करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्याची सुनावणी न्या. श्री. वर्धन देसाई यांच्यासमोर सुरु होती. सरकारतर्फे 13 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने आरोपींविरुध्दचे सबळ पुरावे आणि महत्वाच्या साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्यमानून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

हा खून प्रेमप्रकरणातून झाला होता. अक्रम याचे एका आरोपीच्या भावजयीशी प्रेमसंबंध होते. याच्या रागातूनच ही घटना घडली होती. 

Web Title: Life imprisonment in Miraj Murder case

टॅग्स