खूनप्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव  (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. बाळू उर्फ रामराव साहेबराव यादव (वय 31, रा.पारगाव ता. खंडाळा) असे त्याचे नाव आहे.

सातारा- भांडण सोडवायला आलेल्याचा खुन केल्याप्रकरणी पारगाव  (ता.खंडाळा) येथील एकाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. लढ्ढा यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. बाळू उर्फ रामराव साहेबराव यादव (वय 31, रा.पारगाव ता. खंडाळा) असे त्याचे नाव आहे.

चाकूने केलेल्या हल्यात आबा उर्फ आकाश तुकाराम गायकवाड (वय20, रा. पारगाव) याचा खून झाला होता. या प्रकरणी दत्तात्रय प्रकाश गायकवाड (वय 24, रा. पारगाव) यांनी खंडाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 15 सप्टेंबर 2014 रोजी दुपारी वारंवार चिडवत असल्याच्या कारणावरून बाळू यादवचा एकाशी वाद सुरू होता. खंडाळा येथील शिवशक्ती चौकातील हॉटेल चवणेश्वर समोर वाद सुरु होता. ते भांडण सोडविण्यासाठी आबा तिथे गेला. मात्र, संतप्त झालेल्या बाळूने आबावर धारदार चाकूने वार केले. यामध्ये आबाचा मृत्यू झाला.

खंडाळा पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक अशोक शेळके यांनी तपास करुन जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. साक्षीदारांच्या साक्षी व सहायक सरकारी वकील अॅड. लक्ष्मण खाडे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीश लढ्ढा यांनी बाळूला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

Web Title: Life imprisonment for one person in murder case