नशेत पत्नीचा खून करणाऱ्याला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

खटल्यात १४ साक्षीदारांची साक्ष झाली. सरकारी पक्षाकडून ॲड. विवेक शुक्‍ल यांनी काम पाहिले. कागल तालुक्‍यातील भडगाव येथे १३ जुलै २०१८ मध्ये ही घटना घडली होती. सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र याच्या दारू पिण्यावरून तो आणि पत्नी दीपाली यांच्यात वारंवार खटके उडत होते.

कोल्हापूर -दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करून निर्दयपणे तिचा खून करणाऱ्या रामचंद्र दत्तात्रय पोवार याला न्यायालयाने जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी हा निकाल दिला. 

खटल्यात १४ साक्षीदारांची साक्ष झाली. सरकारी पक्षाकडून ॲड. विवेक शुक्‍ल यांनी काम पाहिले. कागल तालुक्‍यातील भडगाव येथे १३ जुलै २०१८ मध्ये ही घटना घडली होती. सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र याच्या दारू पिण्यावरून तो आणि पत्नी दीपाली यांच्यात वारंवार खटके उडत होते.

हेही वाचा - सरकारच्या स्थापनेच्या किमान समान कार्यक्रमावर राजू शेट्टी म्हणाले, 

2018 मधील घटना

१३ जुलै २०१८ रोजी रात्री त्यांच्यात जोरदार भांडण झाले. भांडणाचा आवाज घराबाहेर येत होता, मात्र हा रोजचाच प्रकार असल्याने गावकऱ्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता रामचंद्र पत्नीचा मृतदेह घेऊन गावातील पांडुरंग खतकर यांच्या घरासमोरील कट्टयावर बसून होता. आपण काल रात्री पत्नीला मारहाण केली, त्यात तिचा मृत्यू झाला, असे तो गावकऱ्यांना सांगत होता. या प्रकाराची माहिती पोलिसपाटील भारमल यांनी मुरगूड पोलिस ठाण्यात दिली. मुरगूड पोलिस ठाण्यात रामचंद्र याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा -  शेतकऱ्यांनो, संयम पाळा; राजू शेट्टींनी का केले असे आवाहन ? 

खटल्यात १४ जणांची साक्ष

तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक व्ही. एन. दराडे यांनी तपास केला. आरोपपत्र दाखल केल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांच्या न्यायालयात सुरू झाले. खटल्यात १४ जणांची साक्ष तपासण्यात आली. खुनाचा प्रयत्यक्षदर्शी कोणी नसल्याने परिस्थितीजन्य पुरावे आणि सरकारी वकील शुक्‍ल यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने रामचंद्र पोवार याला जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोन महिन्यांची साधी कैद दिली गेली आहे.

हेही वाचा - राज्य नाट्य स्पर्धेत प्रथमच यांची दमदार एंट्री
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Life Imprisonment In Wife Murder Case