आयुष्यमान योजना कागदावरच वयस्क

तात्या लांडगे
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

सोलापूर - आयुष्यमान भारत योजना सुरू झाल्याची घोषणा या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्रदिनी केली. या योजनेंतर्गत देशातील दारिद्य्ररेषेखालील प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांपर्यंत मान्यताप्राप्त रुग्णालयांमधून शस्त्रक्रिया व उपचाराचा लाभ मिळणार आहे. मात्र, मागील सहा-सात महिन्यांपासून या योजनेची फक्‍त माहितीच गोळा करण्याचे काम सुरू असून, आतापर्यंत ५० टक्‍केदेखील माहिती संकलित झालेली नाही. यामुळे ही योजना कागदावरच वयस्क होतना दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कधी लाभ मिळणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने २१ मार्च २०१८ रोजी दिलेल्या मंजुरीनंतर या योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यातील सव्वादोन लाख तर राज्यात ८३ लाख ६३ हजार कुटुंबांचा समावेश झाला आहे. परंतु, या योजनेला प्रत्यक्षात कधीपर्यंत सुरवात होणार हे अद्यापही अनिश्‍चितच आहे.

ठळक बाबी...
देशातील १०.७४ कोटी कुटुंब योजनेसाठी पात्र
महाराष्ट्रातील ८३.६३ लाख कुटुंबांना मिळणार योजनेचा लाभ
मे २०१८ पर्यंत सर्व माहिती भरणे अपेक्षित; परंतु निम्मेच काम अपूर्णच
माहिती संकलनानंतर होणार हॉस्पिटलची निवड
योजनेतील पात्र कुटुंबांची होणार फेरपडताळणी

योजनेसाठी २०११ च्या जात व सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणाचा आधार घेतला आहे. सर्वेक्षणाला सात वर्षे पूर्ण झाल्याने तेव्हाची आणि सध्याची स्थिती काय, याची माहिती मागविली आहे. त्यासाठी आणखी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागेल.
- डॉ. रमेश सोनोने, जिल्हा समन्वयक, आयुष्यमान भारत योजना

Web Title: Life plan is only adult on paper