...अन् जीवदान मिळालेल्या घारीने घेतली आकाशात भरारी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

दोघेही शेजारील घराच्या गॅलरीत गेले. तेथून मोठ्या काठीने घारीचे मांज्यात अडकलेले पंख त्यांनी मोकळे केले. पंख मोकळे होताच वायु वेगाने घारीने आकाशात भरारी घेतली. तिला जीवदान देणाऱ्या दोघाही कर्मचाऱ्यांचे नागरीकांनी कौतुक केले.

कऱ्हाड : येथील शनिवार पेठेत झाडावरील पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या पक्षाची पालिकेच्या अग्नीश्यामक दलाच्या जवानांनी सुटका केली. नागरीकांना सतर्कतेने ती घटना कळविल्याने अवघ्या काही कालवधीत घारीची सुटका करण्यात यश आले. येथील देसाई गल्लीत हा प्रकार घडला.

त्याबाबत तेथील नागरीकांनी पत्रकार राजू सनदी यांना माहिती दिली. त्यांनी त्वरीत ती घटना अग्नीश्यामक दलास कळवली. अग्नीश्यामक दलाचे जवान अनिल डुबल व उत्तम बेचके तेथे पोचले. तेथे आलेल्या अग्नीश्यामक दलाच्या जवानांनी परिस्थिती पाहिली. त्यांना उंबराच्या झाडात पतंग अडकला होता. त्या पतंगाच्या मांज्यात घार अडकली होती. त्या दोघांना वरही चढता येत नव्हते.

दोघेही शेजारील घराच्या गॅलरीत गेले. तेथून मोठ्या काठीने घारीचे मांज्यात अडकलेले पंख त्यांनी मोकळे केले. पंख मोकळे होताच वायु वेगाने घारीने आकाशात भरारी घेतली. तिला जीवदान देणाऱ्या दोघाही कर्मचाऱ्यांचे नागरीकांनी कौतुक केले.

Web Title: life save for kite in Karhad

टॅग्स