वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या कोल्ह्यास जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fox

वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या कोल्ह्यास जीवदान

सांगली - धामणी (ता. मिरज) येथील मिरज-अंकली या नव्या महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत कोल्हा गंभीर जखमी झाला. वनविभाग आणि प्राणीमित्रांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कोल्ह्यास रेस्क्यू केले. अधिक माहिती अशी, धामणी (ता. मिरज) येथील एका शेतात कोल्हा जखमी अवस्थेत असल्याची माहिती प्राणीमित्र मंदार शिंपी, मुस्तफा मुजावर यांना मिळाली. त्यांनी तत्काळ मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांना याची माहिती दिली. त्यांच्यासह प्राणीमित्रांची टीम घटनास्थळी धावली.

राजू कोळी यांच्या शेतात कोल्हा जखमी अवस्थेत पडून होता. त्याची हालचाल काहीच होत नाही आहे, असे लक्षात आले. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली होती. वनविभागाचे वनरक्षक युवराज पाटील व त्यांची टीम दाखल झाली. जखमी कोल्ह्याला उपचारासाठी ‘डब्ल्युआरसी’ टीमजवळी पिंजरा आणला. कोल्हा गंभीर जखमी अवस्थेत होता. त्याला प्राणीमित्र आणि वनविभागाने रेस्क्यू केले. डब्ल्युआरसीचे सचिन साळुंखे, मंदार शिंपी यांच्यासह सदस्यांनी चिखलात उतरून कोल्ह्यास पिंजऱ्यात कैद केले.

कोल्ह्याची अवस्था पाहता त्याला तत्काळ औषध उपचाराची गरज होती. वनरक्षक सागर थोरवत यांच्यासमवेत ॲनिमल राहतचे डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक उपचार करण्यात आले. पुढील उपचारासाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: Life Saving Of Fox Injured In Vehicle Collision

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top