"बॅग लिफ्टिंग'ला आळा घालण्यासाठी दक्षता घ्या 

"बॅग लिफ्टिंग'ला आळा घालण्यासाठी दक्षता घ्या 

सांगली - बॅगेतून किंवा मोटारीतून रक्कम नेणे सुरक्षित नसल्याचे वेळोवेळी चोरट्यांनी सिद्धच केले आहे. पोलिसांचे बॅंक पेट्रोलिंग सुरू आहे. परंतु पोलिस सर्वत्र पाळत ठेवू शकत नाहीत. त्यामुळे बॅंकेत रोकड भरणा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी जाताना सुरक्षितता बाळगणे हाच उपाय ठरू शकतो. कारण चोरट्यांनी बॅंकेसमोरून रोकड लांबवण्याची "मोडस' बदलून चोरटे आता बॅंकापासूनही पाठलाग करू लागलेत. 

सांगलीतील पुष्पराज चौकातील एचडीएफसी बॅंकेसमोरून भरदिवसा रोकड लांबवण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. लाखो रुपयांची रोकड चोरट्यांनी सहजपणे लांबवली. अशाच घटना आझाद चौकातील ऍक्‍सिस बॅंकेसमोरही पाच-सहा वर्षांत घडल्या आहेत. काही बॅंकांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही चोरटे दिसले. परंतु पोलिस त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत. पोलिसांनी आतापर्यंत चेन स्नॅचिंगचे अनेक गुन्हे उघडकीस आणले. परंतु सांगलीतील बॅग लिफ्टिंगचे गुन्हे अद्यापही तपासावरच दिसून येतील. बॅंकेतून रोकड घेऊन जाताना चोरट्यांनी त्यावर सहजपणे डल्ला मारल्याच्या घटना पाहिल्यातर अनेकदा यामध्ये निष्काळजीपणा दिसून येतो. निष्काळजीपणे आणि सावधगिरी न बाळगता रक्कम नेताना चोरट्यांनी हिसडा मारून बॅग लांबवली आहेत. तसेच बॅंकेतून रोकड काढल्यानंतर ती सुरक्षित न ठेवता दुचाकीला अडकवणे किंवा मोटारीत ठेवणे यामुळे चोरट्यांना ती सहज लंपास करणे शक्‍य होते. बॅंकासमोर पाळत ठेवून दुचाकी किंवा मोटार पुढे गेल्यानंतर पाठलाग करून संधी मिळताच रोकड लंपास करण्याचे प्रकार दोन-चार महिन्यांत घडले आहेत. मोटारीत रक्कम सुरक्षित राहू शकते हा भ्रम चोरट्यांनी खोटा ठरवला आहे. त्यामुळे रोकड ने-आण करताना सुरक्षितता बाळगणे आणि दक्षता घेणे हाच उपाय ठरू शकतो. ग्राहकांनी दक्षता घेतली तर चोरट्यांना रोकड लांबवण्याची संधीच मिळणार नाही. पोलिसांचे बॅंक पेट्रोलिंग सुरूच आहे. परंतु प्रत्येक बॅंकेच्या परिसरात सतत पहारा देणे किंवा प्रत्येक ग्राहकावर लक्ष ठेवणे शक्‍य नसते. त्यामुळे खबरदारी घेणेच आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com