लिंगायत धर्म महामोर्चासाठी अक्कलकोट मध्ये जनजागृती फेरी

राजशेखर चौधरी
शुक्रवार, 1 जून 2018

अक्कलकोट (पुणे) : लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळण्यासाठी रविवारी (ता.3) सोलापूर येथे लिंगायत धर्म महामोर्चा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी अक्कलकोट तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर लिंगायत बांधवांचा सहभाग राहण्यासाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती अक्कलकोट यांच्या वतीने विविध माध्यमातून जनजगृती फेरी काढण्यात आली आहे.

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील जवळपास 160 गावातून समन्वय समितीने जनजगृती केली असून प्रत्येक गावातील लिंगायत बांधवाना या मोर्चाचे उद्दिष्ट आणि असे होण्याने भविष्यात लिंगायत बांधवांचा होणार लाभ याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.त्याचाच भाग म्हणून आज शुक्रवारी दिवसभर कुंभारी, वळसंग, तीर्थ, चपळगाव, किणी, वागदरी, शिरवळ, मैंदर्गी, दुधनी, तोळणूर, नागणसुर, जेऊर, करजगी, तडवळ आदी गावातून चार चाकी गाड्यांची प्रबोधन रॅली काढण्यात आली.

उद्या शनिवारी (ता.2) रोजी सकाळी ८ वाजता तालुक्यातील सर्व लिंगायत समाज बांधवाच्या उपस्थितीत दुचाकी फेरी शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात येणार आहे.एकंदारीत सोलापूरच्या मोर्चात अक्कलकोट तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून हजारो बांधव सहभागी व्हावेत यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.अक्कलकोट तालुक्यातील सर्व गावातील बसवेश्वर तरुण मंडळ,विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था यांच्या सहकार्याने मोर्चा यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.या महामोर्चात लिंगायत समाजबांधवानी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन मल्लिकार्जुन बामणे यांनी केले आहे.

Web Title: lingayat community rally in akkalkot

टॅग्स